निर्यातीसाठी नाशिक जिल्ह्यातील साडेतीन हजार द्राक्षप्लॉटची नोंदणी
निर्यातीसाठी नाशिक जिल्ह्यातील साडेतीन हजार द्राक्षप्लॉटची नोंदणी 
मुख्य बातम्या

नाशिक जिल्ह्यात ३५०० द्राक्षप्लॉटची निर्यातीसाठी नोंदणी

टीम अॅग्रोवन

नाशिक  : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य राष्ट्रांमध्ये द्राक्षांची निर्यात करण्यासाठी आवश्‍यक असलेल्या द्राक्षप्लॉट नोंदणी प्रक्रियेत आतापर्यंत नाशिक जिल्ह्यातील सुमारे साडेतीन हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून, या प्रक्रियेंतर्गत या वर्षात आतापर्यंत जिल्ह्यातील सुमारे २२९५ हेक्‍टर क्षेत्रावरील द्राक्षबागांची नोंदणी पूर्ण झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली.

गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी अद्याप द्राक्षबागांच्या नोंदणीचे प्रमाण कमी असले, तरी डिसेंबरअखेरपर्यंत मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षीही द्राक्षबागांची नोंदणी होण्याची अपेक्षा कृषी विभागाला आहे. निर्यातक्षम रेसिड्यू फ्री द्राक्षांसाठी कृषी विभागाकडे द्राक्ष बागांची नोंदणी आवश्‍यक असून, या वर्षी १५ ऑक्‍टोबरपासून या प्रक्रियेला सुरवात झाली. प्रक्रियेच्या सुरवातीच्या टप्प्यात आतापर्यंत सुमारे ३४९९ प्लॉटची नोंदणी झाली आहे. गेल्या वर्षी डिसेंबरअखेरपर्यंत ३० हजार ४२७ प्लॉटची नोंदणी झाली होती. त्या तुलनेत या वर्षी नोंदणी करणाऱ्या उत्पादकांनी संख्या कमी असली तरी डिसेंबरपर्यंत हे प्रमाण वाढण्याची अपेक्षा कृषी विभागाला आहे.

गेल्या वर्षी नाशिक जिल्ह्यातून सुमारे एक लाख दोन हजार ८१६ मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात झाली होती. याच प्रमाणात या वर्षीही निर्यातीचा टप्पा गाठण्यासाठी आणखी २६ ते २७ हजार प्लॉटची नोंदणी होणे आवश्‍यक असून, शेतकऱ्यांनी ३१ डिसेंबरपर्यंत द्राक्षप्लॉटची नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय पडवळ यांनी केले आहे.

अशी करता येईल प्लॉट नोंदणी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या बागेतील द्राक्षांची निर्यात करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा गावातील कृषी सहायक यांच्याकडे प्लॉटची नोंदणी करता येणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना द्राक्षबागेचा सातबारा व खाते उतारा व प्रत्येक प्लॉटसाठी ५० रुपये शुल्क भरावे लागणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : विदर्भात गारपिटीचा इशारा

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

SCROLL FOR NEXT