Rabi sowing was delayed due to rains in Parbhani, Hingoli
Rabi sowing was delayed due to rains in Parbhani, Hingoli 
मुख्य बातम्या

परभणी, हिंगोलीत पावसामुळे रब्बी पेरणी लांबली

टीम अॅग्रोवन

परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यात मंगळवार (ता.१३) पासून पावसाचा जोर ओसरला आहे. परंतु, ढगाळ हवामान आणि वेगाचे वारे यामुळे पावसाची शक्यता दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता कायम आहे. दरम्यान, सोयाबीन काढणी तसेच कापूस वेचणीची कामे अपूर्ण राहिली आहेत. जमिन वाफशावर नसल्यामुळे रब्बीची पेरणी लांबली आहे. 

मंगळवारी (ता.१४) सकाळी आठ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासांमध्ये परभणी जिल्ह्यातील परभणी तालुक्यातील परभणी, पेडगाव, जांब, झरी, सिंगणापूर मंडळामध्ये जिंतूर तालुक्यातील जिंतूर, सांवगी म्हाळसा, बोरी,  आडगाव, चारठाणा,सेलू तालुक्यातील सेलू , देऊळगाव, वालूर, कुपटा, चिकलठाणा, मानवत तालुक्यातील मानवत, केकरजवळा, कोल्हा, पाथरी तालुक्यातील पाथरी, बाभळगाव, हादगाव, गंगाखेड तालुक्यातील गंगाखेड, महातपुरी, माखणी, पालम तालुक्यातील पालम, चाटोरी, बनवस, पूर्णा तालुक्यातील पुर्णा, ताडकळस, लिमला, कात्नेश्वर या मंडळात हलक्या ते जोरदार सरी कोसळल्या. पालम आणि पूर्णा तालुक्यातील अनेक मंडळांत पावसाचा जोर होता. जिल्ह्यात ऑक्टोंबर महिन्यात अपेक्षित पावसाच्या २१६.९ टक्के पाऊस झाला.

हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, नरसी नामदेव, सिरसम, डिग्रस, माळहिवरा, खंबाळा, कळमनुरी तालुक्यातील कळमनुरी, वाकोडी, नांदापूर, आखाडा बाळापूर, डोंगरकडा, वारंगा, वसमत तालुक्यातील वसमत, आंबा, हयातनगर, गिरगाव, हट्टा, टेंभुर्णी, कुरुंदा, औंढना नागानाथ तालुक्यातील औंढा नागनाथ, येळेगाव, साळणा, जवळा बाजार, सेनगाव तालुक्यातील सेनगाव, साखरा, पानकन्हेगाव, हत्ता मंडळामध्ये पाऊस झाला.

मूग, उडदानंतर आता पावसामुळे सोयाबीन, कपाशी, तूर पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. डागील सोयाबीन आणि भिजलेल्या कापसाची कमी दराने खरेदी केली जात आहे. शासनाने सर्व शेतकऱ्यांना विमा परतावा मंजूर करावा. नुकसानीचे पंचनामे पूर्ण करावे.  - नरेश शिंदे, सनपुरी, जि. परभणी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : एप्रिलमध्ये पिकांचे २७ कोटींचे नुकसान

Agriculture Irrigation : आक्रोश मोर्चाचे रूपांतर उपोषणात

Cotton Cultivation : सरासरीच्या तुलनेत यंदा कपाशीची लागवड वाढणार

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

SCROLL FOR NEXT