लातूर जिल्ह्यात रब्बी पेरणी केवळ ११ टक्के
लातूर जिल्ह्यात रब्बी पेरणी केवळ ११ टक्के 
मुख्य बातम्या

लातूर जिल्ह्यात रब्बी पेरणी केवळ ११ टक्के

टीम अॅग्रोवन

लातूर ः जिल्ह्यात परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्याने रब्बीच्या पेरणीवर मोठा परिणाम झाला आहे. आक्टोबर संपत आला तरी पाऊस झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यात फक्त ११ टक्केच रब्बीची पेरणी झाली आहे. त्याचे पीकदेखील शेतकऱ्यांच्या हातात येईल याची शक्यता धूसर आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार अहमदपूर, जळकोट, चाकूरमध्ये रब्बीची पेरणीच झालेली नाही. त्यामुळे या वर्षी पुन्हा शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

लातूर जिल्ह्यात या वर्षी पहिल्यापासूनच पावसाने पाठ फिरवली आहे. मोठे पाऊस तर झालेच नाहीत. पण रिपरिपही फारसी झाली नाही. त्यात परतीच्या पावसाने तर मोठी हुलकावणी दिली आहे.

जिल्ह्यात सरासरी ५१५.२२ मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्याची टक्केवारी ६४.२३ इतकी आहे. तालुकानिहाय झालेला पाऊस पुढीलप्रमाणे आहे. कंसात आकडे टक्केवारीचे आहेत. लातूर ४०८.५३ (५७.२२), औसा ४५३.९७ (५५.७८), रेणापूर ४९८.७५(६९.२५), अहमदपूर ५५२.७३ (६६.३२), चाकूर ६४१.५६ (७६.८५), उदगीर ४६१.५२(५२.४०), जळकोट ५०६.५०(५६.१०), निलंगा ५३७.४९(७५.४५), देवणी ५०७.८६ (५६.२५) शिरुर अनंतपाळ ५८३.३०(८१.८८) जिल्ह्यात रब्बीचे पेरणीचे क्षेत्र एक लाख ९५ हजार हेक्टरचे आहे.

आत्तापर्यंत केवळ २३ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. याची टक्केवारी ११.९ इतकी आहे. जिल्ह्यात रब्बीच्या हंगामात हरभरा मोठ्या प्रमाणात पेरला जातो. याचे जिल्ह्यातील क्षेत्र नऊ हजार हेक्टरवर आहे. याची पेरणी मात्र एक हजार आठशे हेक्टर क्षेत्रावरच होऊ शकली आहे. रब्बी ज्वारीचे क्षेत्र तीन हजार हेक्टरच्या घरात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT