पेरणी
पेरणी  
मुख्य बातम्या

अकोला जिल्ह्यात रब्बी पेरणी ५० टक्क्‍यांच्या अातच

टीम अॅग्रोवन

अकोला ः विविध संकटांना सामोरे जात असलेल्या शेतकऱ्यांना रब्बी हंगामापासून फारशा अपेक्षा उरलेल्या नाहीत. रब्बी पेरण्यांचा काळ संपत अालेला असताना जिल्ह्याचे रब्बी क्षेत्र अातापर्यंत जेमतेम ५० टक्क्यांपर्यंतही पोचू शकलेले नाही. जिल्ह्यात सर्व पिके मिळून ४२ टक्के क्षेत्रावर रब्बी पिकांची लागवड होऊ शकली अाहे. यात सर्वाधिक ४६ हजार ८८१ हेक्टर हरभऱ्याचे क्षेत्र अाहे. हे क्षेत्रही लक्ष्यांक असलेल्या एक लाख २२०० हेक्टरच्या तुलनेत ६६.४ टक्के एवढेच अाहे. या रब्बी हंगामासाठी जिल्ह्यात एक लाख ४२ हजार ३० हेक्टरचे नियोजन तयार करण्यात अाले होते. प्रत्यक्षात अातापर्यंत ४९ हजार ४०० हेक्टरवर पेरण्या होऊ शकलेल्या अाहेत. जिल्ह्यात दरवर्षी हरभऱ्याचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असते. हे क्षेत्र शेतकऱ्यांना रब्बीमध्ये दिलासा देऊन जाते. गव्हाच्या लागवडीतही अशीच प्रचंड घट अालेली अाहे. अवघी दोन हजार हेक्टरपर्यंत कशीबशी लागवड पोचली. या वर्षी खरिपातील पिकांची उत्पादकता जेमतेम राहिल्याने किमान रब्बीत ही तूट भरून निघेल या उद्देशाने शेतकरी अपेक्षा लावून होते. मात्र रब्बी पिकांची लागवडच लक्ष्यांकापर्यंतही पोचलेली नाही. रब्बी लागवडीसाठी दिवसेंदिवस अोल कमी होत गेल्याने तसेच प्रकल्पांमधून सिंचनासाठी पाणी मिळण्याची शक्यता नसल्याने शेतकऱ्यांनी इच्छा असून पेरणी केली नाही. तसेच रब्बी लागवडी न होण्यास पैसा हेसुद्धा कारण ठरले अाहे. खरीप पीक अाले नाही. पीककर्जही या मोसमात भेटलेले नसल्याने अाधीच शेतकरी अडचणीत अालेला होता. अनेकांजवळ लागवडीसाठी पैशांची उपलब्धता नव्हती. यामुळे रब्बी पिकांच्या लागवडीवर परिणाम झाल्याची शक्यता कृषी तज्ज्ञांकडून वर्तविली जात अाहे. अजून पंधरा दिवसांत अाणखी लागवड झाली तरी हे क्षेत्र ५५ टक्क्यांपेक्षा अधिक होणार नसल्याची शक्यता व्यक्त होत अाहे.  

पीक     लक्ष्यांक    

प्रत्यक्ष लागवड (हेक्टरमध्ये)  

हरभरा     १,०२,२००     ४६,८८१
गहू     ३१,३००     २०८०
ज्वारी     १४३०     ०.५
कांदा     ३०००     ११५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT