PNE16L25033-1.jpg
PNE16L25033-1.jpg 
मुख्य बातम्या

राज्यात रब्बीच्या क्षेत्रात बारा टक्क्याने वाढ

सुर्यकांत नेटके

नगर : राज्यात यंदा रब्बीचे क्षेत्र सरासरीच्या पुढे गेले आहे. मात्र गेल्यावर्षीपेक्षा यंदा १२ टक्के अधिक पेरणी झाली.  गेल्यावर्षी ५७ लाख ६४ हजार ०५६ हेक्टरवर एकूण पेरणी झाली होती. यंदा ५७ लाख ८२ हजार हेक्टरवर १२३ हेक्टरवर पेरणी झाली आहे. ज्वारीचे क्षेत्र सरासरीपेक्षा २० टक्क्यांनी घटले आहे. गेल्यावर्षी ज्वारी ८६.५३ टक्क्यावर पेरली गेली होती. यंदा ज्वारीची ८०.६३ टक्के पेरणी झाली आहे. 

राज्यातील बहुतांश भागात यंदा परतीच्या पावसाच्या वेळी सलग बऱ्याच काळ पाऊस झाल्याने ज्वारीची वेळेत पेरणी करता आली नाही. त्यामुळे ज्वारीचे क्षेत्र घटले, नगर, मराठवाडा, सोलापुर भागात ज्वारीचे सर्वाधिक क्षेत्र असते. ज्वारीच्या जागी हरभरा, गहू, मक्याची पेरणी झाली आहे. कडधान्याची गेल्यावर्षीपेक्षा ११४ टक्के पेरणी झाली आहे. तेलबियांत यंदा पन्नास टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.  दृष्टीक्षेपात राज्यातील रब्बीची स्थिती  

  • गव्हाचे सरासरी ८ लाख ७५ हजार ६३३ हेक्टर क्षेत्र असून यंदा ११ लाख ९७ हजार हेक्टरवर म्हणजे ३४ टक्के अधिक पेरणी झाली आहे.  गतवर्षीच्या तुलनेत गव्हाचे ३६ हजार हेक्टर क्षेत्र वाढले
  • ज्वारीचे २० लाख २७ हजार २५८ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. यंदा १६ लाख ३४ हजार ६२६ म्हणजे ८०.६३ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली. गेल्यावर्षी १८ लाख ८८ हजार ९९५ हेक्टरवर पेरणी झाली होती. 
  • हरभऱ्याचे १७ लाख ४३ हजार २५९ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. यंदा २४ लाख ८० हजार ५४९ हेक्टरवर पेरणी झाली आहे. सरासरीच्या सुमारे सात लाख हेक्टर तर गतवर्षीपेक्षा दोन लाख हेक्टर क्षेत्राने वाढ झाली आहे. 
  • मक्याचे २ लाख ६३ हजार ८९६ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. यंदा २ लाख ८३ हजार ५२६ हेक्टरवर पेरणी झाली आहे. गेल्यावर्षीपेक्षा वीस हजार हेक्टर क्षेत्र वाढले आहे. 
  • तेलबियांचे ८९ हजार २२७ हेक्टर सरासरी क्षेत्र असले तरी यंदा ४४ हजार ९२५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गेल्यावर्षीपेक्षा सव्वा चार हजार हेक्टर क्षेत्र वाढले असले तरी राज्याच्या तुलनेत कडधान्याचे क्षेत्र अत्यंत अल्प आहे. 
  • कडधान्याची १८ लाख ४८ हजार ९३३ हेक्टर क्षेत्र आहे. गेल्यावर्षी २३ लाख ९० हजार २०७ हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा त्यात ९ टक्क्यांनी वाढ होऊन २६ लाख ५३७६ हेक्टरवर पेरणी झाली आहे. कडधान्याच्या क्षेत्रात यंदा सरासरीच्या तुलनेत सुमारे आठ लाख हेक्टरने वाढ झाली आहे.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Sadabhau Khot : 'आधी कडकनाथवर बोला', भर सभेत शेतकऱ्यांचा सदाभाऊ खोतांना सवाल

    Onion Export Ban : केंद्र सरकारच्या चलाखीमुळे कांदा निर्यातीवरील लगाम कायम; शेतकऱ्यांना कितीपत फायदा होणार?

    Kolhapur Water Shortage : गावांना टँकरद्वारे पाण्याची गरज, लोकप्रतिनिधी, प्रशासन निवडणुक कामात व्यस्थ

    Agriculture Industry : उद्योगाच्या घरी रिद्धी-सिद्धी...

    Success Story : अल्पभूधारकांच्या शेतात फुलली हिरवाई

    SCROLL FOR NEXT