Rabi season hybrid tide saved farmer in Buldana district
Rabi season hybrid tide saved farmer in Buldana district 
मुख्य बातम्या

बुलडाणा जिल्ह्यात रब्बीत हायब्रीड ज्वारीने तारले 

टीम अॅग्रोवन

बुलडाणा ः खरिपातील सोयाबीन काढून गहू किंवा हरभऱ्याचे पीक घेणारे शेतकरी असंख्य आहेत. परंतु जिल्ह्यात यावर्षी जानेफळ (ता. मेहकर) परिसरातील शेतकऱ्यांनी संकरित ज्वारीची लागवड केली. या पिकाने शेतकऱ्यांना चांगला हात दिल्याचे शेतकरी सांगत आहेत. गहू, हरभरा या पिकांना एक पर्याय म्हणून शेतकरी संकरित ज्वारी लागवडीकडे आता बघू लागले आहेत. 

या भागातील शेतकरी सोयाबीन व तूर अशी पीक पद्धती वर्षानुवर्षे जोपासून आहेत. सोयाबीन काढून काही शेतकरी गहू, हरभऱ्याची लागवड करतात. मात्र, या हंगामापासून रब्बीत संकरित ज्वारीचा प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जानेफळ (ता. मेहकर) भागात अधिक वाढली. या तालुक्यात ३०० एकरापेक्षा अधिक क्षेत्रावर लागवड झाली. 

काहींनी सोयाबीन काढणीनंतर गहू, हरभऱ्याऐवजी ज्वारीची लागवड केली होती. त्या पिकाची काढणी अंतिम टप्प्यात पोचली आहे. शेतकऱ्यांना सरासरी २० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळाले. तर तुरीचे पीक काढून ज्यांनी हायब्रीड ज्वारीची पेरणी केली त्या शेतकऱ्यांचे पीक या महिन्याच्या अखेरपर्यंत तयार होणार आहे. एप्रिलमध्ये उष्णतेमुळे ज्वारीच्या कणसात दाणे भरतील किंवा नाही याबाबत सुरुवातीला शंका व्यक्त केल्या जात होत्या. मात्र, सध्या कणसांमध्ये भरघोस दाणे भरले आहेत. 

एकरी १५ ते २० क्विंटलदरम्यान सर्रास उतारा येईल, अशी अपेक्षा आहे. दरवर्षी रब्बीत गहू, हरभरा हीच पिके घेतली जातात. पिकबदल नसल्याने किडींचा प्रादुर्भाव वाढत आहे. याचा उत्पादनावर परिणाम होऊ लागल्याने अनेकदा शेतकऱ्यांना नुकसान झेलावे लागते, अशा स्थितीत ज्वारीचे पीक फायदेशीर ठरू लागले आहे. 

भाकरीची प्रतिष्ठा वाढली  ज्वारीचे पीक मागील काही वर्षात कालबाह्य झाले आहे. त्यामुळे चाऱ्याचाही प्रश्‍न बिकट होत गेला. आता मात्र, दैनंदिन आहारात ज्वारीला मागणी वाढली आहे. ‘भाकरी’ला पुन्हा प्रतिष्ठा प्राप्त झाली. त्यामुळे गव्हाच्या तुलनेत ज्वारीचे दर अधिक आहेत. ज्वारीला सरासरी दोन हजार रुपये क्विंटलपेक्षा अधिक दर मिळतो. ज्वारी पिकाला एकरी मिळून सर्व खर्च सात हजारांपर्यंत लागतो. तुलनेने एकरात २० क्विंटल उत्पादन मिळाले व दोन हजारांचा सरळ दर राहल्यास ४० हजारांचे उत्पादन होते. खर्च वजा जाता शेतकऱ्यांना एकरी किमान २५ हजारांपेक्षा अधिक उत्पन्न येत आहे. 

या मोसमात आम्ही पहिल्यांदा हायब्रीड ज्वारीची लागवड केली आहे. पीक कणसे भरण्याच्या स्थितीत आहे. एकरी किमान २० क्विंटल उत्पादन अपेक्षित आहे. काही शेतकऱ्यांची काढणी झाली असून सरासरी इतकाच उतारा मिळालेला आहे. हरभरा उत्पादक दरवर्षी मर रोगाने त्रस्त झाले आहेत. त्यांच्यासाठी हायब्रीड ज्वारीचा चांगला पर्याय निर्माण झाला.  - रमेश निकस, जानेफळ, ता. मेहकर जि. बुलडाणा 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT