Rabbi sowing crossed the general area
Rabbi sowing crossed the general area 
मुख्य बातम्या

नांदेड : रब्बीच्या पेरणीने सर्वसाधारण क्षेत्राचा टप्पा पार केला

टीम अॅग्रोवन

नांदेड ः नांदेड जिल्ह्यात बुधवार (ता. ११) पर्यंत एकूण १ लाख ४३ हजार ९३४ हेक्टरवर (१०५.३० टक्के) पेरणी झाली आहे. जिल्ह्यातील रब्बीच्या पेरणी क्षेत्राने सर्वसाधारण क्षेत्राचा टप्पा पार केला आहे. आजवर हरभऱ्याची दुपटीच्या जवळपास, ज्वारीची निम्म्याहून अधिक क्षेत्रावर पेरणी झाली आहे. अद्याप गहू, करडईचे क्षेत्र २५ टक्क्यांच्या आतच आहे, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

सिंचनासाठी पाणी उपलब्ध असल्यामुळे यंदा रब्बीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. गतवर्षी प्रमाणेच यंदाही शेतकऱ्यांनी हरभऱ्याला सर्वाधिक पसंती दिली आहे. जिल्ह्यात रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ३६ हजार ७१२ हेक्टर आहे. यामध्ये रब्बीचे ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र २६ हजार ९७५ हेक्टर, गव्हाचे ३८ हजार ५३८ हेक्टर, मक्याचे ३ हजार १७६ हेक्टर, हरभऱ्याचे ६२ हजार ३५९ हेक्टर, करडईचे ४ हजार ७६८ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. बुधवार (ता. ११) पर्यंत जिल्ह्यातील सर्व १६ तालुक्यांमध्ये मिळून एकूण १ लाख ४३ हजार ९६४ हेक्टरवर (१०५.३० टक्के) पेरणी झाली आहे.

अर्धापूर, हदगाव, माहूर, किनवट, उमरी, धर्माबाद, बिलोली, देगलूर या ८ तालुक्यांतील रब्बीचे पेरणी क्षेत्र सर्वसाधारण क्षेत्रापेक्षा अधिक आहे. नांदेड, मुदखेड, हदगाव, हिमायतनगर, भोकर, नायगाव, मुखेड, कंधार, लोहा या ९ तालुक्यांत १५.२७ ते ७४.२९ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मुखेड तालुक्यातील पेरणीची टक्केवारी सर्वांत कमी आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Farmer : निवडणूक काळात संत्रा उत्पादक उपेक्षित

Chara Chavani : चारा छावण्या सुरू करण्याची पशुपालकांची मागणी

Cotton Sowing : महाराष्ट्रात कापसाचा पेरा राहणार ४२ लाख हेक्टरवर

Animal Heat Stress : वाढत्या उष्म्याचा पशुधनाला धोका

Agriculture Technology : शेती तंत्रज्ञान, पिकांबाबत शेतकरी साक्षर असणे गरजेचे

SCROLL FOR NEXT