खानदेशात रब्बीत अत्यल्प पीक कर्जवाटप
खानदेशात रब्बीत अत्यल्प पीक कर्जवाटप 
मुख्य बातम्या

खानदेशात रब्बीत अत्यल्प पीक कर्जवाटप

टीम अॅग्रोवन

जळगाव ः खानदेशात रब्बी हंगामातील पेरण्या जवळपास ९० टक्के पूर्ण झाल्या आहेत. परंतु पीक कर्जवाटपासंबंधीची गती वाढलेली नाही. खरिपाप्रमाणे रब्बीतही ४० टक्केही पीक कर्जवाटप होणार नाही, अशी स्थिती आहे.  रब्बी हंगामासंधी जळगाव जिल्ह्यात सुमारे ६०० कोटी, धुळ्यात २०० कोटी व नंदुरबारातही सुमारे १५५ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर झाला आहे. सर्वाधिक पीक कर्जवितरण जिल्हा बॅंकांना करायचे आहे. परंतु, जिल्हा बॅंकांकडे रब्बीसंबंधी पीककर्ज मागणीचे अर्ज येत नसल्याचे सांगितले जात आहे. जिल्हा बॅंकांचे अनेक सभासद किंवा कर्जदार शेतकरी थकबाकीदार झाले आहेत. मागील हंगामातही रब्बी हंगामात ३० टक्केही पीककर्ज वितरण झाले नव्हते. जळगाव जिल्ह्यात सेंट्रल बॅंक अग्रणी बॅंक म्हणून काम करीत आहे. तर नंदुरबारात स्टेट बॅंक अग्रणी बॅंकेच्या भूमिकेत आहे. या दोन्ही बॅंकांकडूनही रब्बीमधील पीक कर्जवाटपाचा लक्ष्यांक अद्याप ४० टक्केही पूर्ण झालेला नाही. धुळे जिल्ह्यात जिल्हा बॅंकेला रब्बीमध्ये पीककर्ज वितरणाचा लक्ष्यांक देण्यात आलेला नाही. यामुळे या बॅंकेकडून रब्बीमध्ये पीक कर्ज वितरण होणार नसल्याचे सांगण्यात आले.  नंदुरबार जिल्ह्यात सुमारे २० टक्के, धुळ्यात १४ टक्के तर जळगाव जिल्ह्यातही १५ टक्‍क्‍यांपर्यंत रब्बीसंबंधीचे पीककर्ज वितरित झाले आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : विदर्भात पावसाचा अंदाज; पावसासोबतच राज्यातील अनेक भागात उन्हाचा चटका कायम

Fodder News : विक्रीसाठी चारा उपलब्ध असणाऱ्या शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करा; पशुसंवर्धन आयुक्तांचे आदेश

Agriculture Land : नसलेल्या जमिनीचा शोध!

Crop Management : जमीन, पाऊसमानानुसार करा कोरडवाहू पिकाचं नियोजन

Watermelon Cultivation : प्रयोगशीलता जपत केली खरबूज लागवड

SCROLL FOR NEXT