संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

अकोला, वाशीममध्ये रब्बी पिकांचे क्षेत्र वाढण्याची शक्यता

टीम अॅग्रोवन

अकोला  ः यंदा अकोला, वाशीम जिल्ह्यांत चांगला पाऊस झाला असून धरण प्रकल्पांमध्येही पुरेसा पाणीसाठा अाहे. परिणामी या दोन्ही जिल्ह्यांत रब्बीचे लागवड क्षेत्र वाढविण्याचे नियोजन कृषी विभागाकडून केले जात अाहे. दुसरीकडे लगतच्या बुलडाणा जिल्ह्यात यंदा कमी पाऊस झाला असून परतीच्या पावसानेही आतापर्यंत पुरेसा दिलासा दिलेला नाही. यामुळे तेथे रब्बीबाबत साशंकता निर्माण होऊ लागली अाहे. नियोजनाच्या दृष्टीने प्रशासकीय यंत्रणासुद्धा सध्या चाचपडत अाहेत.

अकोला, वाशीम या दोन्ही जिल्ह्यांमध्ये रब्बीच्या दृष्टीने पोषक स्थिती अाहे. शिवाय गेल्या अाठवड्यात दोन दिवस काही भागात दिलासादायी पाऊस झाला. यामुळे रब्बीला मोठ्या प्रमाणात चालना मिळण्याची शक्यता अाहे. अकोला, वाशीम या दोन्ही जिल्ह्यांमध्ये सरासरी क्षेत्राच्या तुलनेत अधिक क्षेत्रावर पेरणीचे नियोजन केले जात अाहे. प्रामुख्याने हरभरा पिकाचे क्षेत्र वाढविण्यावर भर दिला जात अाहे. दोन्ही जिल्हे मिळून हरभऱ्याची सुमारे दीड लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी होणार अाहे. यानंतर गव्हाचे क्षेत्र लागवडीखाली येईल.

हरभऱ्याच्या क्षेत्रातील वाढ लक्षात घेता बाजारपेठेत बियाणे, खतांची उपलब्धता करून दिली जात अाहे. सध्या उडीद हंगाम सुरू असून सोयाबीनची काढणीसुद्धा लवकर सुरू होईल. सोयाबीन काढणीनंतर अाॅक्टोबरमध्ये सरसकट रब्बी पेरणीला सुरवात होणार अाहे. रब्बीसाठी अकोला व वाशीम या दोन्ही जिल्ह्यांमधील काही प्रकल्पांमधून पाणी देण्याचे नियोजनसुद्धा अंतिम टप्प्यात अाहे.   बुलडाण्यात परतीच्या पावसावरच रब्बी अवलंबून बुलडाणा जिल्ह्यात सरासरीच्या ३१ टक्के कमी पाऊस झाला अाहे. जिल्ह्यात अातापर्यंत केवळ ४६५ मिमी पाऊस पडलेला अाहे. परिणामी खरिपातील पिकांचे मोठे नुकसान झाले अाहे. अाता परतीचा पाऊस जोरदार झाला तर रब्बीच्या दृष्टीने फायदेशीर होऊ शकेल. परतीच्या पावसावरच या जिल्ह्यातील रब्बी हंगाम अवलंबून अाहे.    

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Farmer Issue : मेगारिचार्ज योजनेसह केळीचे प्रश्‍न प्रलंबित

Water Scarcity : पाण्याच्या आशेने करमाळ्यात विहिरींची खोदाई

Sharad Joshi : शरद जोशींचा अंगारमळा लवकरच इतिहास जमा होईल...

Kharif Season : खते, बी-बियाणे वेळेत उपलब्ध करा

Crop Insurance : केळी विमाधारक वादळात नुकसानीच्या परताव्यांपासून वंचित

SCROLL FOR NEXT