रब्बी हमीभाव जाहीर : गव्हात ८५, हरभऱ्यात २५५ रुपये वाढ 
रब्बी हमीभाव जाहीर : गव्हात ८५, हरभऱ्यात २५५ रुपये वाढ  
मुख्य बातम्या

रब्बी हमीभाव जाहीर : गव्हात ८५, हरभऱ्यात २५५ रुपये वाढ 

टीम अॅग्रोवन

नवी दिल्ली : केंद्र सरकारने रब्बी हंगामाकरिताच्या पिकांच्या हमीभावाची घोषणा आज (ता. २३) केली. सर्वाधिक मसूरकरिता ३२५ रुपये, हरभऱ्यासाठी २५५ आणि गव्हाकरिता ८५ रुपये प्रति क्विंटल वाढ करण्यात आली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थव्यवहार समितीच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. रब्बी हंगाम २०१९-२० मधील पिके, ज्यांची विक्री २०२०-२१मध्ये होणार आहेत, त्यांच्याकरिता हे हमीभाव लागू असणार आहेत. रब्बीच्या धान्यखरेदीसाठी सरकारी खरेदी संस्थांना सुसज्ज राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.  रब्बी हमीभाव २०२०-२१  विविध धान्यांचे जाहीर झालेले दर रुपयांत (प्रतिक्विंटल)

प्रकार- २०१९-२० २०२०-२१ वाढ 
गहू १८४० १९२५ ८५ 
बार्ली १४४० १५२५ ८५ 
हरभरा ४६२० ४८७५ २५५ 
मसूर ४४७५ ४८०० ३२५ 
मोहरी ४२०० ४४२५ २२५ 
करडई ४९४५ ५२१५ २७० 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या उष्णतेचा पशुधनास फटका

Public Well Policy : सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर धोरण काय?

Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

Jalgaon Lok Sabha : ...तर जळगावचे चार खासदार पोहोचतील लोकसभेत

Banana Orchard Burn : सातपुड्याच्या पायथ्याशी केळी बागा करपल्या

SCROLL FOR NEXT