मृदा आरोग्य पत्रिकावाटपात पुणे आघाडीवर
मृदा आरोग्य पत्रिकावाटपात पुणे आघाडीवर 
मुख्य बातम्या

मृदा आरोग्य पत्रिकावाटपात पुणे आघाडीवर

टीम अॅग्रोवन

पुणे : शेतकऱ्यांना जमिनीत असलेल्या अन्नद्रव्याचे प्रमाण समजण्यासाठी शासनामार्फत मागील दोन वर्षांपासून मृदा आरोग्य पत्रिका वाटप करण्यात येत आहे. या वाटपामध्ये पुणे जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. आतापर्यंत पुणे जिल्ह्यात ८२ हजार ७५८ माती नमुन्यांची तपासणी पूर्ण केली असून एक लाख ९३ हजार २५ शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रिका वाटप करण्यात आल्या आहेत.

पिकांना आवश्यक असलेली बहुतांशी अन्नद्रव्ये मातीतून उपलब्ध होत असल्याने खतांची मात्र ठरविण्यापूर्वी माती परिक्षण करणे आवश्यक आहे. केंद्र सरकारने यासाठी मृदा आरोग्य पत्रिका अभियान २०१५ पासून सुरू केले आहे. या अभियानांअंतर्गत दर दोन वर्षात जिल्ह्यातील सर्व गावात माती परिक्षण करून शेतकऱ्यांना जमीनीची आरोग्य पत्रिका विनामुल्य देण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे.

दरवर्षी गावांची निवड करून त्या गावांच्या निव्वळ पेरणी क्षेत्राच्या प्रमाणात जिरायती क्षेत्रात दहा हेक्टरला एक आणि बागायती क्षेत्राच्या एक हेक्टरसाठी एक असे माती नमुने तपासले जातात. त्यानुसार शेतकऱ्यांना जमीन पीकनिहाय शिफारशीसह जमीन आरोग्य पत्रिका देण्यात येतात.

या अभियानांतर्गत पुणे जिल्ह्यात २०१५-१६ आणि २०१६-१७ या दोन वर्षांच्या पहिल्या सत्रात एक हजार ८४४ गावात एक लाख ७१ हजार ६०३ माती नमुने तपासून सहा लाख ५७ हजार १४ शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिकेचे वितरण करण्यात आले आहे. तालुकानिहाय सुपिकता निर्देशांक काढताना तालुक्यातील सर्व नमुन्यांची सरासरी धरण्यात येते. प्रत्यक्ष शेतकऱ्यांचे जमीनीतील मातीचे निष्कर्ष त्यापेक्षा वेगळे असू शकतात. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांने पीक आणि खताचे नियोजन करण्यापूर्वी माती तपासणी करून त्यांच्या जमीन आरोग्य पत्रिकांचा वापर करणे आवश्यक आहे.

यंदापासून सुरू होणाऱ्या दोन वर्षाचे अभियानाचे दुसरे सत्र आहे. या दोन वर्षात जिल्ह्यातील सर्व गावातील माती नमुने पुनश्च तपासले जाणार आहेत. गेल्या २०१७-१८ मध्ये जिल्ह्यातील ९१० गावांत एकूण ८६ हजार ५९२ माती नमुने तपासणी करून साधारणत तीन लाख २३ हजार ६५१ शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रिका वितरण केले जाणार आहेत.

मागील दोन वर्षांत जिल्ह्यात साडेसहा लाख आरोग्य पत्रिकांचे वाटप केले आहे. अभियानाचे हे दुसरे सत्र आहे. यामध्ये जवळपास सव्वा तीन लाख जमीन आरोग्य पत्रिकावाटप केले जाणार आहे. जमीन आरोग्य पत्रिका वाटपात राज्यात पुणे जिल्हा अव्वल आहे. -यशवंत केंजळे, जिल्हा मृद चाचणी अधिकारी, पुणे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Rate : वाढत्या उन्हामुळे साखरेला मागणी, दरातही वाढ

Food Security Scheme : अन्नसुरक्षा योजनेत पुरवल्या अप्रमाणित निविष्ठा

Jowar Market : पंचवीस हजार क्विंटल ज्वारीची कमी दराने विक्री

Heat Wave Maharashtra : उन्हाच्या चटक्याने राज्य होरपळले

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

SCROLL FOR NEXT