पुणे जिल्हा कृषिनिष्ठ शेतकरी, आदर्श गोपालक पुरस्कार जाहीर
पुणे जिल्हा कृषिनिष्ठ शेतकरी, आदर्श गोपालक पुरस्कार जाहीर 
मुख्य बातम्या

पुणे जिल्हा कृषिनिष्ठ शेतकरी, आदर्श गोपालक पुरस्कार जाहीर

टीम अॅग्रोवन

पुणे : जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागातर्फे देण्यात येणाऱ्या कृषिभूषण डॉ. अप्पासाहेब पवार कृषिनिष्ठ शेतकरी, शरद आदर्श कृषिग्राम, आदर्श गोपालक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. मंगळवारी (ता. १०) दुपारी १ वाजता पुण्यातील अल्पबचत भवन येथे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होणार असल्याची माहिती कृषी व पशुसंवर्धन समितीच्या सभापती सुजाता पवार यांनी दिली. 

अप्पासाहेब पवार कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कारात जिल्ह्यात सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या पुरंदर तालुक्यातील काळेवाडी येथील शंकर नारायण काळे यांना ११ हजार रुपये, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन सपत्नीक गौरविण्यात येणार आहे. उर्वरित प्रत्येक तालुक्यात निवड झालेल्या शेतकऱ्यांना पाच हजार रुपये स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. शरद आदर्श कृषी ग्राम पुरस्कारासाठी निवड झालेल्या गावातील सरपंच, ग्रामसेवकांना २१ हजार रुपये स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र देण्यात येणार आहे. तर दुग्धोत्पादनात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या गोपालकांचाही पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. 

कृषिभूषण डॉ. अप्पासाहेब पवार कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कारविजेते : सर्वसाधारण विभाग शंकर नारायण काळे, काळेवाडी, पो. दिवे (ता. पुरंदर), मुकुंद बबन ठाकर, येळसे, पो. पवनानगर (ता. मावळ), विकास हरिभाऊ चव्हाण, पारगाव तर्फे आळे (ता. जुन्नर), रवींद्र तुळशीराम तोत्रे, कुरवंडी (ता. आंबेगाव), विलास हरिदास बालगुडे, मुर्टी (ता. बारामती), नीलेश भगवान जुगदर, हातवे बु. (ता. भोर), सुहास ज्ञानदेव जगदाळे, लिंगाळी (ता. दौंड), दशरथ लक्ष्मण गायकवाड, वडकी (ता. हवेली), विजयकुमार बाबूराव घोलप (ता. इंदापूर), नवनाथ शंकर दरेकर, पाईट, (ता. खेड), गुलाब सदू कोंढरे, कोंढूर, पो. मुठा (ता. मुळशी), वैशाली सुनील जगताप, मांडवगण फराटा (ता. शिरूर), गंगाराम भिकाजी शिर्के, पाल बु.,पो. गुंजवणे (ता. वेल्हे) 

आदिवसी गट  कांताराम लुमाजी लोहकरे, तेरुंगण (ता. आंबेगाव), सुरेश नाना कशाळे, डेहणे (ता. खेड), नामदेव गेनभाऊ जाधव निमदरी (ता. जुन्नर).

आदर्श गोपालक पुरस्कार विजेते बाळू लक्ष्मण औटी, राजुरी (ता. जुन्नर), भरत मारुती फदाले, फदालेवाडी (ता. आंबेगाव), पोपट गणपत माहिते, गोनवाडी (ता. खेड), नितीन सोपान कुंजीर, वळती (ता. हवेली), नाथा शंकर पिंगळे, साई (ता. मावळ), दिलीप उत्तमराव दगडे, शेरे (ता. मुळशी), यशवंत गोविंद पोळेकर, पालखुर्द (ता. वेल्हे), अशोक रोहिदास लेकावळे, मोहरी बु. (ता. भोर), रोहिदास सदाशिव मेमाणे, पारगाव (ता. पुरंदर), महेश अनंतराव गाडे, कोऱ्हाळे बु. (ता. बारामती), सतिश दशरथ मोरे, मानकरवाडी (ता. इंदापूर), विनोद जयसिंग कोडीतकर, जावजीबुवाची वाडी (ता. दौंड), संभाजी काळूराम भुजबळ, कासारी (ता. शिरूर).  

आदर्श कृषी ग्राम पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायती :  पोंदेवाडी (ता. आंबेगाव), माळेगाव खुर्द (ता. बारामती) कामथडी (ता. भोर), देलवडी (ता. दौंड), आर्वी (ता. हवेली), पवारवाडी (ता. इंदापूर), डिंगोरे (ता. जुन्नर), सातकरस्थळ (ता. खेड), भोयरे (ता. मावळ), आंदगाव (ता. मुळशी), मांडकी (ता. पुरंदर), आंबाळे (ता. शिरूर), पाल बु. (ता. वेल्हे).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Delhi Farmers' protest : भाजपच्या उमेदवारांविरोधात पंजाबमध्ये शेतकऱ्यांचा रोष वाढला; एसकेएमचा विरोध कायम

Lok Sabha Constituency : कोल्हापूर जिल्ह्यातील ३७ लाख ५० हजार मतदारांचा कौल कोणाला? मतदान केंद्रे सज्ज

Fire in Nainital : उत्तराखंडच्या जंगलातील आग पोहचली शेताच्या बांधावर, एका महिलेचा होरपळून मृत्यू

Animal Ear Tagging : ...अन्यथा भरपाई अन् अनुदान नाही

Sunburn Crop : कोवळी रोपे वाचविण्यासाठी शेतकरी सरसावला

SCROLL FOR NEXT