Punchnama was held in Atpadi taluka, when will the compensation be paid?
Punchnama was held in Atpadi taluka, when will the compensation be paid? 
मुख्य बातम्या

आटपाडी तालुक्‍यात पंचनामे झाले, नुकसान भरपाई कधी देणार? 

टीम अॅग्रोवन

आटपाडी, जि. सांगली ः तालुक्‍यात गेल्या वर्षी जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्‍टोबर या चार महिन्यांत नियमित पाऊस झाला. यामुळे रब्बी आणि फळ पिकांचे नुकसान झाले. या बाधित पिकांचे पंचनामे केले. मात्र, अद्यापही शेतकऱ्यांना भरपाई मिळाली नाही, त्यामुळे भरपाई कधी मिळणार असा प्रश्‍न शेतकरी उपस्थित करू लागला आहे. 

तालुक्‍यात जुलै, सप्टेंबर आणि ऑक्‍टोबर मध्ये चार वेळा ४५ मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस होऊन अतिवृष्टी झाली होती. याचा मोठा फटका खरीप, रब्बी आणि फळ पिकांना बसला होता. संपूर्ण हंगामच वाया गेला होता. राज्य सरकारने रब्बी पिकासाठी हेक्टरी ६८०० आणि फळपिकासाठी हेक्टरी १८ हजार रुपये नुकसानभरपाई जाहीर केली होती. आटपाडी तालुक्‍यात महसूल प्रशासनाचे तलाठी, कृषी विभागाचे कृषी सहायक आणि पंचायत समितीचे ग्रामसेवक यांनी संयुक्तपणे पंचनामे केले. 

पहिल्या टप्प्यात १०५०० हेक्‍टर क्षेत्राचे पंचनामे करून शासनाकडे ९ कोटी २५ लाख रुपयांची मागणी केली होती. ही नुकसान भरपाई तीन टप्प्यात आली आणि ऑक्‍टोबर मध्येच ती शेतकऱ्यांच्या खात्यावर जमाही झाली. याचवेळी दुसऱ्या टप्प्यातील पंचनामे करून शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी कृषी विभागाने केलेली आहे. अनेक शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहिले होते. विमा भरलेल्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचे ही पंचनामे केले नव्हते. वंचित शेतकऱ्यांचे पंचनामे करून नुकसान भरपाईची पुरवणी मागणी शासनाकडे केली होती. 

याला सहा महिने झाले असून अनेक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. मार्चपासून संचारबंदी लागू केल्यामुळे प्रशासनाचे कामकाज ठप्प झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई संदर्भात माहिती मिळालेली नाही. अवकाळी मदतीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई जिल्हास्तरावर आली का?, कधी येणार आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी जमा होणार असे प्रश्‍न उपस्थित होऊ लागले आहेत. 

अवकाळीमुळे रब्बी पिकाचे नुकसान झाले. प्रशासनाने पंचनामे केले. मात्र, अद्याप ही नुकसान भरपाई मिळालेली नाही.  - आनंदा लेंगरे, शेतकरी, लेंगरेवाडी, ता. आटपाडी 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

महाराष्ट्रासाठी आर्थिक विकासाची ‘गॅरंटी’, नवी दिल्ली भेटीत पंतप्रधानांचे आश्वासन

Crop Insurance : सोयाबीन पिकाला विम्याचा लाभ मिळालाच नाही

Pre Kharif Review Meeting : बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी भरारी पथके नेमा

Sharad Pawar : सध्याचे केंद्रातील सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात: शरद पवार

Mumbai Weather : मुंबईसाठी २२ दिवस धोक्याचे

SCROLL FOR NEXT