‘पिंपळगाव खांड’तून पिण्यासाठी आवर्तन
‘पिंपळगाव खांड’तून पिण्यासाठी आवर्तन 
मुख्य बातम्या

‘पिंपळगाव खांड’तून पिण्यासाठी आवर्तन

टीम अॅग्रोवन

लिंगदेव, जि. नगर : मुळा नदीवरील पिंपळगाव खांड (ता. अकोले) धरणातून ५०० क्‍युसेकने पिण्यासाठी आवर्तन सोडण्यात आले. आवर्तन सोडताना धरणात ५४३ दशलक्ष घनफूट पाणीसाठा होता. हे आवर्तन १५ दिवस चालणार आहे. आवर्तनात ३५० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात येणार आहे. 

जास्तीत जास्त गावांपर्यंत पाणी पोचवायचे असल्याने आवर्तनात कोणताही अडथळा आणू नये; अन्यथा संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून प्रांताधिकाऱ्यांनी पिंपळगाव खांड धरण ते मांडव्यापर्यंत जमावबंदी आदेश लागू केला आहे. 

आवर्तन संपेपर्यंत हा आदेश लागू असेल. आवर्तनास अडथळा येऊ नये, यासाठी मुळा नदीकाठी पोलिस बंदोबस्त असेल. शिवाय आवर्तन काळात २१ तासांचे भारनियमन केले जाण्याची शक्‍यता आहे. लाभक्षेत्रातील सुमारे २२ गावांना या आवर्तनातून पिण्यासाठी पाणी मिळणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Stamp Duty : सातारा जिल्ह्यात पीककर्जासाठी ‘मुद्रांक शुल्क’ माफ

Onion Market : कांदा दरात घसरणीने उत्पादक अडचणीत

Water Scarcity : लोणी भापकर योजनेमुळे आठ गावे अन् ७८ वाड्या होणार टंचाईमुक्त

Co-operative Society : विकास सेवा सोसायट्यांवर आता ‘सीसीटीव्ही’चा ‘वॉच’

Silver Rate : चांदी दरात १४०० रुपयांची वाढ

SCROLL FOR NEXT