बुलडाणा जिल्ह्यात कर्जमाफीच्या अपात्र खातेदारांची यादी प्रसिद्ध करा
बुलडाणा जिल्ह्यात कर्जमाफीच्या अपात्र खातेदारांची यादी प्रसिद्ध करा 
मुख्य बातम्या

'बुलडाणा जिल्ह्यात कर्जमाफीच्या अपात्र खातेदारांची यादी प्रसिद्ध करा'

टीम अॅग्रोवन

बुलडाणा : जिल्ह्यात सध्या पीक कर्जवाटपाची कार्यवाही सुरू असून, जिल्हा उपनिबंधक कार्यालय व जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक यांच्याकडील अनेक नावे अपात्र यादीत आहे. त्या अनुषंगाने अपात्र यादीमधील खातेदारांची नावे तालुकानिहाय संबंधित तहसीलदार व सहायक निबंधक कार्यालयांमध्ये प्रसिद्ध करावी. तसेच संबंधित बँक शाखांनी पीक कर्जवाटप मेळावे आयोजित करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाने यंत्रणांना केली आहे.  याबाबत सहायक निबंधक व त्यांचे पथक संबंधितांचे कार्यालयात दर सोमवार व गुरुवार या दिवशी उपस्थित राहतील. या दिवशी शेतकऱ्यांचे कर्जवाटप व तक्रारींचे निवारण करतील. या दिवशी संबंधित तहसीलदार हे भेट देऊन नियंत्रण ठेवतील. तरी कर्जमाफीच्या याद्यांमधील अपात्र शेतकरी खातेदारांची माहिती तहसील कार्यालय, सहायक निबंधक कार्यालयात प्रसिद्ध करावीत, अशा सूचना करण्यात आली आहे. 

कर्जमाफी योजनेच्या तक्रार निवारणार्थ तालुकास्तरीय समित्या गठित छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेसंदर्भात असलेल्या तक्रारी निवारणार्थ तालुकास्तरीय समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी योजनेच्या लाभासंदर्भात काही तक्रारी असल्यास सदर संबंधित तालुक्यातील समित्यांकडे द्याव्या, असेही जिल्हा प्रशासनाने आवाहन केले आहे. या समित्यांचे अध्यक्ष संबंधित सहायक निबंधक असून, सहकार अधिकारी सदस्य सचिव आहेत. समितीत अग्रणी बँक असलेल्या सेंट्रल बँकेचे प्रतिनिधी, जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचे प्रतिनिधी, तालुका लेखापरीक्षक सहकारी संस्था यांचा समावेश आहे. तालुकास्तरीय समित्यांचे सदस्य व त्यांचे मोबाईल क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत : खामगाव : सहायक निबंधक एम. ए. कृपलानी ९४२२१८४४९७, सहकार अधिकारी ए. एस. शास्त्री मो. ९६५७७६८९३५, तालुका लेखापरीक्षक वि. का. ठाकरे ९४२२९४६४४६, बँक निरीक्षक भानुदास मिरगे ७०२०२९५४८४ आणि सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे रविकुमार ९८३४८३९०२०.  देऊळगाव राजा : सहायक निबंधक आर. एल. राठोड ९४२३४२१३४५, बँक निरीक्षक एन. डी. कोल्हे ८८०६५८६२४३, एसबीआय शाखाधिकारी श्री. सुत्राळे ९०७५०१३४०७, उपलेखापरीक्षक पी. बी. कस्तुरे ८६०५३१३४९१ आणि सहकार अधिकारी एस. एस. भोईटे ८८८८३७४७७७. मेहकर तालुका : प्रभारी सहायक निबंधक जी. आर. फाटे ७०५७४७३३७३, जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचे विभागीय अधिकारी व्ही. आर. झनक ९७६७४५५५३७, सेंट्रल बँक शाखा प्रबंधक अरुण डिकळे ७५०७७७४२१६, तालुका लेखापरीक्षक एच. एस. पाटील ९८८१८५१८२७, सहकारी अधिकारी जी. आर. फाटे ७०५७४७३३७३.  जळगाव जामोद : सहायक निबंधक एस. पी. जुमडे ७३५०६७११५८, बँक निरीक्षक एस. एन. हेलोडे ९८८१४०७९६१, सेंट्रल बँक शाखा प्रतिनिधी आर. एफ. इनवाते ९८९०४९७२९३, तालुका लेखापरीक्षक व्ही. एम. लोखंडे ९७६७६९००७५, सहकार अधिकारी डी. आर. इटे ९८२२८३२४८०. मलकापूर : सहायक निबंधक एम. ए. कृपलानी ९४२२१८४४९७, पी. एन. झळके ९९२२५८७८४९, तालुका लेखापरीक्षक अरुण पाटील ७३८५०३४४९९, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे पी. व्ही. बावस्कर ९८६०९७६५२२ आणि जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचे आशिष देशमुख ९८२२८७८०३३.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Rain : वादळी पावसाने टोमॅटो, मिरची, भेंडीसह ऊस पीक उद्धवस्त, नुकसान भरपाई मिळणार कधी?

Konkan Ranmeva : कोकणच्या रानमेव्यावर वातावरणाचा परिणाम, अनेकांचे आर्थिक गणित कोलमडणार

Agrowon Podcast : हळदीचे भाव तेजीतच; कापूस, सोयाबीन, गहू, लिंबू यांचे काय आहेत दर पाहुयात?

Ethanol Production : कांदा उत्पादकांच्या पाठोपाठ ऊस उत्पादकांनाही सरकारनं घोषणा करून भूलवलं ? | शेतीच्या बातम्या

Maharashtra Rain : राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; देशातील अनेक भागात तापमानाचा पारा ४२ ते ४६ अंशाच्या दरम्यान

SCROLL FOR NEXT