सोलापूर ः दिनदर्शिकेचे प्रकाशन शुक्रवारी (ता. २२) सोलापुरात झाले. त्या वेळी (डावीकडून) सकाळचे युनिट मॅनेजर किसन दाडगे, कोठारी ॲग्रीटेकचे संचालक गौरव कोठारी, संचालक पुष्कराज कोठारी, आत्माचे  विजयकुमार बरबडे, सहयोगी संपादक अभय दिवाणजी.
सोलापूर ः दिनदर्शिकेचे प्रकाशन शुक्रवारी (ता. २२) सोलापुरात झाले. त्या वेळी (डावीकडून) सकाळचे युनिट मॅनेजर किसन दाडगे, कोठारी ॲग्रीटेकचे संचालक गौरव कोठारी, संचालक पुष्कराज कोठारी, आत्माचे विजयकुमार बरबडे, सहयोगी संपादक अभय दिवाणजी.  
मुख्य बातम्या

'ॲग्रोवन'च्या दिनदर्शिकेचे सोलापुरात दिमाखात प्रकाशन

टीम अॅग्रोवन

सोलापूर : ‘सकाळ-ॲग्रोवन’च्या २०१८ या नववर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन शुक्रवारी (ता.२२) सोलापुरात कोठारी ॲग्रीटेक कंपनीचे संचालक पुष्कराज कोठारी, संचालक गौरव कोठारी आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेचे (आत्मा) प्रकल्प संचालक विजयकुमार बरबडे यांच्या हस्ते झाले.

सोलापुरात सकाळ कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाला ‘सकाळ’चे सहयोगी संपादक अभय दिवाणजी, युनिट मॅनेजर किसन दाडगे उपस्थित होते. या वेळी बोलताना पुष्कराज कोठारी म्हणाले, ‘ॲग्रोवनच्या माध्यमामुळे आज शेती क्षेत्रात मोठी जनजागृती झाली आहे, कामानिमित्त मी परराज्यात फिरतो, तेव्हा अनेक ठिकाणी ॲग्रोवन संदर्भासाठी वाचला जात असल्याचे पाहतो, विश्‍वासार्हता हेच त्याचे मूळ आहे.

सकाळ माध्यम समूूहाचे अनेक सामाजिक उपक्रम आम्हालाही प्रभावित करतात.’ या वेळी युनिट मॅनेजर किसन दाडगे आणि सहयोगी संपादक अभय दिवाणजी यांनीही सकाळ आणि ॲग्रोवनच्या विविध उपक्रमांची माहिती पाहुण्यांना दिली. आभार ॲग्रोवनचे बातमीदार सुदर्शन सुतार यांनी मानले.

शेती आणि शेतकऱ्यांना ॲग्रोवनमुळे दिशा मिळाली आहे. शेती क्षेत्रातील नवे बदल, माहिती, अत्याधुनिक तंत्रज्ञान ॲग्रोवनमुळेच आज अचूक आणि खात्रीशीरपणे शेतकऱ्यांपर्यंत पोचण्याचे काम होते, एवढी विश्‍वासार्हता ॲग्रोवनने कमावली आहे. - पुष्कराज कोठारी, संचालक, कोठारी ॲग्रीटेक कंपनी

‘सकाळ’ हे सकारात्मक दृष्टीने काम करणारे माध्यम आहे. शेतीतले नवीन बदल आणि तंत्रज्ञान ॲग्रोवनमुळेच समजते, महिला, तरुणांच्या विविध उपक्रमांसह ॲग्रोवनच्या यशाचे गमक हे केवळ विश्‍वासार्हता आहे. - विजयकुमार बरबडे, प्रकल्प संचालक, आत्मा, सोलापूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : विदर्भ, मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा

Pandharpur News : २ जूनपासून भाविकांना घेता येणार श्री विठ्ठल-रखुमाईचं पदस्पर्श दर्शन!

Summer Heat : दिवसा उकाडा, रात्री तडाखा

Soybean Seeds : उगवणशक्ती तपासूनच सोयाबीनचे घरचे बियाणे वापरावे

Water Crisis : महाडला पाणीटंचाईचे उग्ररूप

SCROLL FOR NEXT