परभणीत चारा साक्षरता अभियानाद्वारे जनजागृती
परभणीत चारा साक्षरता अभियानाद्वारे जनजागृती 
मुख्य बातम्या

परभणीत चारा साक्षरता अभियानाद्वारे जनजागृती

टीम अॅग्रोवन

परभणी ः जिल्ह्यत यंदा कमी पावसामुळे उद्भवलेल्या दुष्काळी स्थितीत पशुधनाचा सांभाळ करण्यासाठी योग्य पद्धतीने चारा व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने चारा उत्पादन, साठवणुकीच्या पद्धती, उपलब्ध चाऱ्याचा काटकसरीने वापर आदी बाबी संदर्भात शेतकरी, पशुपालकांमध्ये जनजागृती करण्यासाठी पशुसंवर्धन विभागातर्फे जिल्ह्यात गुरुवार (ता. १०) पर्यंत चारा साक्षरता अभियान राबविण्यात येत आहे.

या अभियानाअंतर्गत जनजागृतीसाठी तयार केलेल्या चित्ररथाचे उद्‌घाटन विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या हस्ते मंगळवारी (ता. १) जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले. 

या वेळी अप्पर जिल्हाधिकारी अण्णासाहेब शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, उपजिल्हाधिकारी संजय कुंडेटकर, विश्वांभर गावंडे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. संजीव खोडवे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. अशोक लोणे, डॉ. शाहेद देशमुख, डॉ. गिरीश लाठकर यांच्यासह पशुसंवर्धन विभागातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. या वेळी विभागीय आयुक्त डॉ. भापकर यांच्या हस्ते अभियानातर्गंत प्रचार तसेच माहितीसाठी पशुपालकांना देण्यासाठी तयार केलेल्या माहिती पत्रकाचे विमोचन करण्यात आले.

टाकळी कुं, पेडगाव, ब्राम्हणगाव (ता. परभणी), मानधनी, बोरी, चारठाणा (ता. जिंतूर), वालूर, कुपटा (ता. सेलू), सोमठाणा, करंजी (ता. मानवत), जवळा झुटे, खेर्डा (ता. पाथरी), डिघोळ, लासीना (ता. सोनपेठ), बोर्डा, राणीसावरगाव (ता. गंगाखेड), बनवस, चाटोरी (ता. पालम), सिरकळस दस्तापूर (ता. पूर्णा) या २० गावांमध्ये चारा साक्षरता अभियानअंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या अभियानाअंतर्गत दुष्काळी परिस्थितीत शासनातर्फे विविध योजनेअंतर्गत वितरित करण्यात येणाऱ्या वैरण बियाणाची माहिती दिली जात आहे. या संदर्भात पशुसंवर्धन उपायुक्त डाॅ. संजीव खोडवे यांनी माहिती दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT