Provide immediate crop loans under debt relief scheme: Agriculture Minister Bhuse
Provide immediate crop loans under debt relief scheme: Agriculture Minister Bhuse 
मुख्य बातम्या

कर्जमुक्ती योजनेअंतर्गत तत्काळ पीककर्ज द्या ः कृषिमंत्री भुसे 

टीम अॅग्रोवन

नाशिक : महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत नाशिक जिल्हा बँकेला ८७० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी तात्काळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिले. 

नाशिक जिल्हा परिषदेत कृषी आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, खासदार डॉ. भारती पवार, आमदार दिलीप बनकर, डॉ. राहुल आहेर, उपाध्यक्ष सयाजीराव गायकवाड,समाज कल्याण समिती सभापती सुशिला मेंगाळ, महिला व बालकल्याण सभापती अश्विनी आहेर, कृषी व पशुसंर्वधन सभापती संजय बनकर, शिक्षण व आरोग्य समिती सभापती सुरेखा दराडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ यांसह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 

मंत्री भुसे म्हणाले की, खरीप पीक हंगामासाठी सध्या पोषक वातावरण असून शेतकऱ्यांना बियाणे, रासायनिक खते व शेती अवाजारे खरेदीसाठी पैशांची आवश्यकता असते. म्हणून शेतकऱ्यांना महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आठवडाभरात निधी उपलब्ध करून, शेतकऱ्यांच्या पीक विमा कर्ज व इतर कर्ज खात्यावर परस्पर जमा न करता त्यांना थेट त्याचा लाभ देण्यात यावा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. 

यावेळी श्री. भुसे यांनी पशुसंवर्धन अधिकारी यांना सध्या मेंढीवर आढळणाऱ्या लंगड्या आजाराची माहिती घेऊन या रोगाचा प्रार्दूभाव रोखण्यासाठी त्वरीत उपाययोजना राबविण्यास पशुसंवर्धन विभागास सांगितले आहे. 

गैरव्यवहार झाल्यास संबंधित बँकांवर गुन्हे  पीककर्जाचा पुरवठा वेळेत झाल्यास जिल्ह्यातील बँकांची कामगिरी व विश्वासार्हता यातून निदर्शनास येईल. मात्र, यामध्ये कोणताही गैरव्यवहार झाल्यास संबंधित बँकांवर गुन्हे दाखल करुन कडक कारवाई केली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

कृषी विभागाला केलेल्या सूचना 

  • मका पिकावरील लष्करी अळीचा प्रार्दुभाव व मुग पीक कीड रोखण्यासाठी प्रभावी उपायायोजना करा 
  • शेतकरी बांधवांना वेळोवेळी आवश्यक मार्गदर्शन करा. 
  • करून देण्यात यावे. ज्या ठिकाणी बियाणांच्या तक्रारी आल्या आहेत तेथे तात्काळ बियाणे उपलब्ध
  • असल्याने उपाययोजना करा. निफाड तालुक्यात काही ठिकाणी डाळिंब पिकावर तेलकट डाग दिसून येत
  • जिल्हा पातळीवर खत व बियाणे पुरवठादारांच्या परवाने नुतनीकरण
  • पेंन्डसीबाबत माहिती घेऊन त्याचा अहवाल सादर करा. 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Crop Damage Rain : वादळी पावसाने टोमॅटो, मिरची, भेंडीसह ऊस पीक उद्धवस्त, नुकसान भरपाई मिळणार कधी?

    Konkan Ranmeva : कोकणच्या रानमेव्यावर वातावरणाचा परिणाम, अनेकांचे आर्थिक गणित कोलमडणार

    Agrowon Podcast : हळदीचे भाव तेजीतच; कापूस, सोयाबीन, गहू, लिंबू यांचे काय आहेत दर पाहुयात?

    Ethanol Production : कांदा उत्पादकांच्या पाठोपाठ ऊस उत्पादकांनाही सरकारनं घोषणा करून भूलवलं ? | शेतीच्या बातम्या

    Maharashtra Rain : राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; देशातील अनेक भागात तापमानाचा पारा ४२ ते ४६ अंशाच्या दरम्यान

    SCROLL FOR NEXT