शेतमाल खरेदी केंद्रांवर सुविधा पुरवा
शेतमाल खरेदी केंद्रांवर सुविधा पुरवा 
मुख्य बातम्या

शेतमाल खरेदी केंद्रांवर सुविधा पुरवा

टीम अॅग्रोवन

पुणे : खरिपातील विविध अन्नधान्यांची काढणी सुरू झाली अाहे. शेतकऱ्यांना आधारभूत किमतीने (एमएसपी) विक्री करण्यासाठी बाजार समित्यांनी विविध सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे आदेश पणन संचालक डॉ. आनंद जाेगदंड यांनी सर्व बाजार समित्यांना दिले आहेत. अनेक बाजार समित्या आधारभूत किमतीने खरेदीसाठीच्या विविध परिपत्रकांचे उल्लंघन करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा बाजार समित्यांवर कडक कारवाईचे संकेतदेखील पणन संचालकांनी दिले आहेत.

शेतमालाच्या दर्जानुसार याेग्य दर मिळवून देण्याची जबाबदारी बाजार समित्यांची आहे. यासाठी विविध उपाययाेजना करणे आवश्‍यक आहे. मात्र बाजार समित्या या उपाययाेजना करीत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान हाेत आहे. हे नुकसान टाळण्यासाठी बाजार समित्यांनी शासनाने जाहीर केलेल्या अन्नधान्यांच्या आधारभूत किमतीचे फलक बाजार समितीच्या लिलाव भागात अथवा आवारात दर्शनी भागात लावण्यात यावेत. तसेच एफ. ए. क्यू.बाबतच्या सूचना शेतकऱ्यांना द्याव्यात. यामध्ये शेतमाल स्वच्छ, चाळणी करून आणि पूर्णपणे वाळवून आणलेला असावा. जेणेकरून आर्द्रतेअभावी शेतमाल नाकारला जाऊ नये किंवा कमी दराने विक्री हाेऊ नये.

अन्नधान्य विक्रीसाठी आणलेल्या शेतकऱ्यांची आॅनलाइन नाेंदणी करावी. यामध्ये पीक नाेंदीसह सात बारा उतारा, आधारकार्ड, भ्रमणध्वनी क्रमांक, बॅंक पासबुकची झेरॉक्स आदी माहितीची संगणक प्रणालीमध्ये नाेंद करावी. अवकाळी पावसाने शेतमाल भिजू नये यासाठी ताडपत्री किंवा लिलावगृहामध्ये जागा उपलब्ध करून द्यावी. अनेक वेळा गाेदामे किंवा लिलावगृहामध्ये व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला शेतमाल ठेवला जाताे. यामुळे शेतकऱ्यांचा शेतमाल ठेवण्यास जागा उपलब्ध नसते. याबाबतची खबरदारी संबंधित बाजार समित्यांनी घ्यावी.

तारण याेजना प्रभावीपणे राबवा अनेक शेतकरी शेतमाल तारण याेजनेत सहभागी हाेऊ इच्छितात. मात्र बाजार समित्यांच्या अनास्थेमुळे शेतकऱ्यांना या याेजनेचा लाभ मिळत नाही. बाजार समित्यांनी शेतमाल तारण याेजनेसाठी प्रभावी उपाययाेजना करून ही याेजना अधिक प्रभावीपणे राबवावी. तसेच धान्य महाेत्सवांचे आयाेजन करून थेट शेतकरी ते ग्राहक संकल्पाना राबवावी, असे आवाहनदेखील पणन संचालकांनी केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : अकोला, सोलापुरात हंगामातील उच्चांकी तापमान

Indian Politics : चीनवरून काँग्रेसचा मोदी सरकारवर पुन्हा हल्लाबोल

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

SCROLL FOR NEXT