कृषी कायद्यांची आंदोलकांकडून होळी
कृषी कायद्यांची आंदोलकांकडून होळी 
मुख्य बातम्या

कृषी कायद्यांची आंदोलकांकडून होळी

वृत्तसेवा

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात राजधानीच्या सीमांवर सुरू असलेल्या आंदोलनस्थळी बुधवारी (ता.१३) शेतकऱ्यांनी लाहोरी सणाचे निमित्त साधत कायद्यांची होळी केली. सिंघू, गाझीपूर, टिकरी सीमांसह उत्तर भारतातील पंजाब, हरियाना, हिमाचल, उत्तर प्रदेशात अनेक भागात शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेचा निषेध केला. केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात आणि हमीभावासाठीच्या कायद्याकरिता शेतकरी दिल्लीच्या सीमांवर ४९ दिवसांपासून आंदोलन करत आहेत. पंजाबात आंदोलनामुळे रेल्वे सेवेवर परिणाम झाला. अनेक गाड्या रद्द केल्या, तर काहींचे मार्ग बदलण्यात आले. आतापर्यंत ८ चर्चांच्या फेऱ्या झाल्या असून १५ जानेवारीस नववी फेरी आहे. केंद्रीय कृषी राज्यमंत्री पुरुषोत्तम रूपाला यांनी केंद्र सरकार चर्चा सुरू ठेवण्याबाबत  सकारात्मक असल्याचे म्हटले आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

Interview with Dashrath Tambale, Director of Atma : सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेतीची सक्ती नाहीच...

Rural Story : जागरण

Sugarcane Management : खोडवा उसाचे व्यवस्थापन

SCROLL FOR NEXT