चंदन लागवडीला प्रोत्साहन; अगरबत्ती उद्योगाला चालना देणार Promotion of sandalwood cultivation; Agarbatti will boost the industry 
मुख्य बातम्या

चंदन लागवडीला प्रोत्साहन; अगरबत्ती उद्योगाला चालना देणार : वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

चंदन लागवडीला प्रोत्साहन देणे तसेच अगरबत्ती उद्योगाला चालना देण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल. चंदन उद्योजकांनी केलेल्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात येतील, असे वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

टीम अॅग्रोवन

मुंबई : चंदन लागवडीला प्रोत्साहन देणे तसेच अगरबत्ती उद्योगाला चालना देण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल. चंदन उद्योजकांनी केलेल्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात येतील, असे वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. मंत्रालयातील दालनात राज्यातील चंदन उत्पादन वाढीसाठी उत्तेजन देण्याबाबत वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (ता.२०) बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक व मुख्य महाव्यवस्थापक (नियोजन) संजीव गौंड, प्रधान मुख्य वनसंरक्षक (उत्पादन व व्यवस्थापन) या बैठकीला उपस्थित होते. भरणे म्हणाले, ‘‘राज्यात चंदनाची लागवड वाढून हा उद्योग वाढल्यास राज्याच्या महसूलात भर पडेल. चंदन उद्योगासाठी धोरणात्मक निर्णय घेऊन जे उद्योजक या क्षेत्रात काम करण्यासाठी तयार आहेत, त्यांना सहकार्य करण्यात येईल. शासनस्तरावरून देण्यात येणाऱ्या परवानग्या विहित वेळेमध्ये देण्याबाबत सर्व यंत्रणांना सूचना देण्यात येतील. चंदन पावडर, तेल तसेच चंदन काड्या यांना मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीयस्तरावर मागणी आहे, त्यामुळे चंदन लागवडीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी शासन सर्वतोपरी मदत करेल. या उद्योगाला बळकटीकरणासाठी शासन नक्कीच प्रोत्साहन देईल. अगरबत्तीच्या व्यवसायात कशा प्रकारे चंदनाचा समावेश करता येईल, याचीही पाहणी वन विभागाने करावी. जेणेकरून अगरबत्ती व्यवसायाला देखील गती मिळेल, असेही राज्यमंत्री भरणे यांनी स्पष्ट केले.   चंद्रपूरचे वनसंरक्षक किशोर मानकर यांनी अगरबत्ती व्यवसायाची सद्य:स्थितीची माहिती सांगितली. चंदन उद्योजक वदीराज मदभावी यांनी शासनाच्या सहकार्याबाबत सविस्तर सादरीकरण केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Electric Tractor Subsidy : इलेक्ट्रिक ट्रॅक्टरला अनुदान, एआयचा वापर आणि शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहनाची शिफारस; स्थायी समितीचा अहवाल सादर

Soybean Procurement: पाच लाख शेतकऱ्यांकडील सोयाबीनची खरेदी शिल्लक आहे का?; पणनमंत्र्यांचा मोठा खुलासा

Organic Turmeric Branding: वाशीमच्या सेंद्रिय हळदीचे होणार ब्रँडिंग

Farmer Struggle Story: कैलास नागरेंच्या बलिदानाची वर्षपूर्ती

Soil Health: एकात्मिक खत व्यवस्थापनातून राखा जमिनीचे आरोग्य

SCROLL FOR NEXT