सिद्धरम्मैय्या 
मुख्य बातम्या

जतला पाणी देण्याचे आश्‍वासन खोटे : सिद्धरामय्या

अलमट्टीच्या बॅक वॉटरमुळे महापूर येतो म्हणणे चुकीचे आहे. कोयना परिसरात झालेला जादा पाऊस आणि धरणातील पाण्याचा विसर्ग, यामुळे महापूर आला होता. - सिद्धरामय्या, माजी मुख्यमंत्री, कर्नाटक

टीम अॅग्रोवन

सांगली : जतला कर्नाटकचे पाणी देण्याबाबत कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पांनी दिलेले आश्‍वासन खोटे आहे. जतला कर्नाटकचे पाणी मिळालेच पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. परंतू फक्त येडियुरप्पाच बोलत आहेत. मात्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत का बोलत नाहीत? असा सवाल कर्नाटकचे कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगली येथे गुरुवारी (ता. १७) पत्रकार परिषदेत केला.

सिद्धरामय्या म्हणाले, "कर्नाटकात कॉंग्रेसला ३८ टक्के, तर भाजपला ३६ टक्के मते मिळाली. भाजपला तिथे सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरी तिथे कॉंग्रेसच मजबूत आहे. सत्ता गेल्यानंतरही कॉंग्रेसची ताकद कायम आहे. १५ जागांवर तिथे पोटनिवडणूक होणार आहे. त्यानंतर सर्वात जास्त कॉंग्रेसच्या जागा असतील. कर्नाटकात मध्यावधी निवडणुका होण्याची शक्‍यता जास्त आहे. भाजप सरकार खोटारडे आहे, ते खरे कधीच बोलत नाही. आजपर्यंत खोट्या आश्‍वासनावरच त्यांनी राजकारण केले आहे. जाहीरनाम्याची पूर्तता कधीच केली नाही.’’ 

‘‘महाराष्ट्रातील निवडणुकीतही खऱ्या प्रश्‍नांपासून मतदारांचे लक्ष विचलित करून हिंदुत्व, ३७०, सर्जिकल स्ट्राइककडे लक्ष वेधले जात आहे. भावनात्मक गोष्टींवर दिशाभूल केली जात आहे. येडियुरप्पा कर्नाटकचे पाणी जतला देणार म्हणतात. परंतू ते शक्‍य वाटत नाही. ते निव्वळ खोटे आश्‍वासन देत आहेत. जतला पाणी जरूर मिळाले पाहिजे. परंतू केवळ येडियुरप्पा बोलून उपयोग नाही. दोन्ही राज्यांनी एकत्र बसून त्याबाबत निर्णय घेतला पाहिजे. दोन्ही राज्यात भाजपची सत्ता आहे,’’ असेही त्यांनी सांगितले. 

‘‘धाडी राजकीय दबावातून असू नयेत. निव्वळ कायदेशीर धाडी असल्या तर काही हरकत नसल्याचे उत्तर दिले. ईव्हीएमवरील मतदान शंका घेण्यासारखे आहे. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या बदल करावा,’’ असेही सिद्धरामय्या म्हणाले. या वेळी प्रवक्ते सचिन सावंत, उमेदवार पृथ्वीराज पाटील, आमदार रामहरी रूपनवर आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Hingoli Crop Loan : हिंगोली जिल्ह्यात पीककर्ज वाटपाचे ३५.१६ टक्के उद्दिष्ट साध्य

Rabi Season : पाच लाख ५४ हजार हेक्टरवर रब्बीत पेरणीचे कृषी विभागाकडून नियोजन

District Co-operative Bank : जिल्हा बँकेवर प्रशासक नियुक्तीच्या हालचाली

Amravati Rain Deficit : अमरावती जिल्ह्यात २२ दिवसांपासून पावसाचा खंड

Crop Damage Panchnama: पिकांवर रोटाव्हेटर फिरवू नका, नुकसानीच्या पंचनाम्यासाठी पुरावे राहतील, सहकारमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आवाहन

SCROLL FOR NEXT