production of 18 lakh 26 thousand tonnes of sugarcane in Nanded division
production of 18 lakh 26 thousand tonnes of sugarcane in Nanded division  
मुख्य बातम्या

नांदेड विभागात उसाचे १८ लाख २६ हजार टन गाळप

टीम अॅग्रोवन

नांदेड : प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयांतर्गत नांदेड विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर या चार जिल्ह्यांतील १३ साखर कारखान्यांनी यंदाच्या गाळप हंगामात बुधवार (ता. ५)पर्यंत १८ लाख २६ हजार ७६ टन उसाचे गाळप केले. सरासरी १०.३८ टक्के उताऱ्याने १८ लाख ९५ हजार ४९० टन साखरेचे उत्पादन घेतले आहे.

नांदेड विभागातील चार जिल्ह्यातील यंदाच्या हंगामात ऊस गाळपाचे परवाने मिळालेल्या १७ पैकी १३ साखर कारखान्यांनी बुधवारपर्यंत केलेल्या ऊस गाळपाची माहिती प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयास सादर केली. त्यानुसार परभणी जिल्ह्यातील ५ पैकी ३ खासगी साखर कारखान्यांनी ४ लाख ४ हजार ६०० टन उसाचे गाळप केले. सरासरी १०.२८ टक्के उताऱ्याने ४ लाख १५ हजार ८४० क्विंटल साखर उत्पादन घेतले. पूर्णा तालुक्यातील बळिराजा शुगर्सचा साखर उतारा सर्वाधिक १०.९२ टक्के आला. 

हिंगोली जिल्ह्यातील ३ सहकारी आणि १ खासगी साखर कारखान्याने ५ लाख ५८ हजार २९६ टन उसाचे गाळप केले. सरासरी १०.६९ टक्के उताऱ्याने ५ लाख ९६ हजार ६०० क्विंटल साखर उत्पादन घेतले. भाऊराव चव्हाण युनिट २ कारखान्याचा उतारा सर्वाधिक १०.८६ टक्के आला. नांदेड जिल्ह्यातील ४ पैकी २ सहकारी आणि २ खासगी साखर कारखान्यांनी एकूण ५ लाख १५ हजार ९५० टन ऊसाचे गाळप केले. सरासरी १०.२६ टक्के साखर उताऱ्याने ५ लाख २९ हजार १५० क्विंटल साखर उत्पादित केली. भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचा (युनिट ४) साखर उतारा सर्वाधिक १०.७१ टक्के आला.

लातूर जिल्ह्यातील २ सहकारी आणि २ खासगी साखर कारखान्यांनी ३ लाख ४७ हजार २३० टन उसाचे गाळप केले. सरासरी १०.१९ टक्के साखर उतारा आला. ३ लाख ५३ हजार ९०० क्विंटल उत्पादन घेतले. सिद्धी शुगर्सचा साखर उतारा सर्वाधिक १०.११ टक्के आला आहे.

जिल्हानिहाय ऊस गाळप स्थिती

जिल्हा कारखाने संख्या ऊस गाळप (टन) साखर उत्पादन (क्विंटल) साखर उतारा (टक्के)
परभणी  ३  ४०४६००  ४१५८४० १०.२८
हिंगोली ५५८२९६ ५९६६०० १०.६९
नांदेड ५१५९५० ५२९१५० १०.२६
लातूर ३४७२३० ३५३९०० १०.१९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : अकोला, सोलापुरात हंगामातील उच्चांकी तापमान

Indian Politics : चीनवरून काँग्रेसचा मोदी सरकारवर पुन्हा हल्लाबोल

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

SCROLL FOR NEXT