termeric export
termeric export  
मुख्य बातम्या

निर्यातीसाठी दर्जेदार हळद उत्पादन घ्या

टीम अॅग्रोवन

हिंगोली: हिंगोली जिल्ह्यात हळदीच्या क्षेत्रात तसेच उत्पादन वाढ झाली आहे. निर्यातीसाठीही मोठी संधी आहे. त्यामुळे मूल्यवर्धन होऊन फायदा होईल. त्यादृष्टीने शेतकऱ्यांनी दर्जेदार हळद उत्पादन घ्यावे. त्यासाठी विविध विभागांकडून आवश्यक ती मदत करण्यासाठी आपण सदैव तत्पर आहोत, असे प्रतिपादन राज्य शासनाच्या हळद संशोधन व प्रक्रिया अभ्यास समितीचे अध्यक्ष तथा हिंगोली चे खासदार हेमंत पाटील यांनी केले. शनिवारी (ता.२६) सायंकाळी चार वाजता सुर्या फार्मर्स प्रोड्युसर्स कंपनी लि.सातेफळ (ता.वसमत) तर्फे नाशिक येथील सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर्स कंपनीच्या माध्यमातून वसमत येथून दोनशे टन हळद बांगलादेशला रवाना करण्यात आली. यावेळी श्री. पाटील  बोलत होते.  यावेळी झूम मिटींगव्दारे सह्याद्री फार्मर्स प्रोड्युर्स कंपनीचे अध्यक्ष विलास शिंदे, महाएफपीचे योगेश थोरात, अपेडा (हैद्राबाद) चे नागपाल लोहकरे, सुर्या फार्मर्स प्रोड्युसर्स कंपनीचे अध्यक्ष प्रल्हाद बोरगड, नगराध्यक्ष श्रीनिवास पोरजवार, नाबार्डचे व्यवस्थापक प्रितम जंगम, तालुका कृषी अधिकारी गोविंद कल्याणपहाड, संजय पांढरे, आदींसह सहकार, पणन विभागाचे अधिकारी उपस्थित व सहभागी झाले होते. श्री.बोरगड म्हणाले, की बांगलादेशच्या प्राण कंपनीने सुर्या फार्मर्स प्रोड्युसर्स कंपनी लि.सातेफळ (ता.वसमत) कडे ३०० टन हळदीची मागणी केली आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात वसमत तालुक्यातील २०० टन हळद निर्यात करण्यात आली.  वसमत येथून ट्रकव्दारे मुंबई येथील जवाहरलाल नेहरु बंदरामध्ये तेथून जहाजाव्दारे बांगलादेशला रवाना करण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात १०० टन हळद पाठविण्यात येणार आहे.  श्री. शिंदे म्हणाले, की हिंगोली जिल्ह्यातील हळद निर्यातीमध्ये सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर्स कंपनीची महत्त्वाची भूमिका आहे. यामुळे शेतकऱ्यांना निश्चित फायदा होईल. उपाध्यक्ष ज्ञानदेव गव्हाणे, संचालक शुभम नादरे, गणेश पान्हेकर, विठ्ठल वाघ, कावेर बोरगड, कळमनुरी येथील गोदा फार्मच्या संचालकांनी पुढाकार घेतला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT