रिक्तपदांमुळे पशुवैद्यक सेवा पुरविण्यास अडचणी
रिक्तपदांमुळे पशुवैद्यक सेवा पुरविण्यास अडचणी 
मुख्य बातम्या

रिक्तपदांमुळे पशुवैद्यक सेवा पुरविण्यास अडचणी

टीम अॅग्रोवन

परभणी  ः जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय आणि जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागांतर्गत विविध संवर्गातील महत्त्वाची पदे रिक्त आहेत. यामुळे जिल्ह्यातील पशुपालक शेतकऱ्यांच्या जनावरांवर वेळेवर, योग्य औषधोपचार करणे अशक्य होत आहे. विविध आजारांवरील प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम प्रभावीपणे राबविता येत नाही. परभणी जिल्ह्यातील नऊ तालुक्यात राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाचे ८ आणि जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाचे ७८ अशी एकूण ८६ पशुवैद्यकीय उपचार केंद्र आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेचे श्रेणी १ चे ३० आणि श्रेणी २ चे ४८, तर राज्य शासनाच्या श्रेणी २ च्या ८ पशुवैद्यकीय उपचार केंद्रांचा समावेश आहे. साधारणातः पाच हजार पशुधनामागे एक पशुवैद्यक असणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील पशुधनाची संख्या साडेपाच लाखावर गेली आहे. परंतु अनेक तालुक्यांच्या मुख्यालयाच्या ठिकाणच्या पशुवैद्यकी उपचार केंद्रातील सह्यायक आयुक्त, पशुधन विकास अधिकाऱ्यांची पदे अनेक वर्षांपासून रिक्त आहेत.  शेतकरी, पशुपालंकांना पशुवैद्यकीय सल्ला तसेच आजारी जनावरांवर वेळेवर उपचार करणे अशक्य होत आहे. विविध आजारांवरील प्रतिबंधक लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविता येत नाही. सध्याच्या मनुष्यबळावर कामाचा ताण येत आहे. राज्य शासनाच्या पशुधन विभागांतर्गत जिल्ह्यात २० पदे मंजूर आहेत. जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयातील उपायुक्तांचे पद रिक्त आहे. जिंतूर येथील सहायक आयुक्त, पशुधन विकास अधिकारी, सेलू येथील सहायक आयुक्त, पशुधन विकास अधिकारी, तसेच तालुक्यातील पशुधन पर्यवेक्षकाची ४ पदे रिक्त आहेत, पूर्णा येथील सहायक आयुक्त आणि पशुधन विकास अधिकारी, पाथरी आणि गंगाखेड येथील सहायक आयुक्तांचे पद रिक्त आहे. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागांतर्गत सहायक पशुधन विकास अधिकाऱ्यांची २२ पैकी ९ पदे रिक्त आहेत, तर पशुधन पर्यवेक्षकांची ५८ पैकी १५ पदे रिक्त आहेत.  पंचायत समिती स्तरावरील ९ पदे तूर्त भरू नयेत असे शासन आदेश आहेत. पशुसंवर्धन गट ड मधील वृणोपचारकांची २४ पैकी पदे रिक्त आहेत. महत्त्वाच्या रिक्त पदांमुळे जिल्ह्यातील विशेषतः जिंतूर, गंगाखेड, पालम तालुक्यांतील डोंगराळ भागातील अाडवळणाच्या गावांतील तसेच जिल्ह्यातील गावातील पशुपालकांना जनावरांवर खासगी पशुवैद्यकाकडून उपचार करावे लागतात. अनेकदा वेळेवर तसेच योग्य औषधोपचार न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना पशुधनास मुकावे लागत आहे. जिल्ह्यातील शेतकरी, पशुपालकांच्या जनावरांवर वेळेवर उपचार करण्यासाठी तसेच पशुवैद्यकीय सेवा देण्यासाठी पशुसंवर्धन विभातील रिक्त पदे भरणे आवश्यक आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Farmer Issue : मेगारिचार्ज योजनेसह केळीचे प्रश्‍न प्रलंबित

Water Scarcity : पाण्याच्या आशेने करमाळ्यात विहिरींची खोदाई

Sharad Joshi : शरद जोशींचा अंगारमळा लवकरच इतिहास जमा होईल...

Kharif Season : खते, बी-बियाणे वेळेत उपलब्ध करा

Crop Insurance : केळी विमाधारक वादळात नुकसानीच्या परताव्यांपासून वंचित

SCROLL FOR NEXT