हमीभाव खरेदीच्या नोंदणीसाठी अडचणी
हमीभाव खरेदीच्या नोंदणीसाठी अडचणी 
मुख्य बातम्या

नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात हमीभाव खरेदीच्या नोंदणीसाठी अडचणी

टीम अॅग्रोवन

नांदेड : आधारभूत किंमत खरेदी योजनेतंर्गत यंदा (२०१९-२०) नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात नाफेड, विदर्भ को.ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन, महाएफपीसीतर्फे खरिपातील मूग, उडीद, सोयाबीनची हमीभावाने खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, ऑनलाइन पीक पेरा प्रमाणपत्र मिळत नसल्याने नोंदणीसाठी शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. खरेदीसाठी आवश्यक मूगाची प्रतिहेक्टरी उत्पादकता निश्चित न केल्यामुळे खरेदी केंद्र कार्यान्वित होण्यास विलंब लागत आहे.

या तीन जिल्ह्यात महाएफपीसीतर्फे शेतकरी उत्पादक कंपन्याकडून नोंदणी केली जात आहे. नाफेडतर्फे परभणी, हिंगोली जिल्ह्यात, तर विदर्भ को ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनतर्फे परभणी जिल्ह्यात नोंदणी सुरू आहे. मूग, उडदाच्या नोंदणीसाठी सोमवार (ता. ३०) आणि सोयाबीनसाठी १५ ऑक्टोबरपर्यंत नोंदणी करता येईल. 

यंदा जाहीर केल्यानुसार प्रतिक्विंटल शेतमालाच्या आधारभूत किमतीत मूग ७ हजार ५० रुपये, उडीद, ५ हजार ७०० रुपये, सोयाबीन ३ हजार ७१० रुपये, तूर ५ हजार ८०० रुपये, खरीप ज्वारी २ हजार ५५० रुपये याप्रमाणे आहेत. सध्या नवीन मुगाची आवक बाजारपेठेत सुरु झाली आहे. परंतु आधारभूत किमतीपेक्षा दोन ते तीन हजार रुपये कमी दराने खरेदी केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

शासकीय हमीभाव खरेदी केंद्र तत्काळ सुरू होणे आावश्यक आहे. नांदेड जिल्ह्यात नाफेडतर्फे अर्धापूर, मुखेड येथील खरेदी केंद्र मंजूर झाले आहेत. किनवट, हदगाव येथील प्रस्तावित आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT