पायाभूत सुविधांअभावी रेशीम उत्पादक अडचणीत
पायाभूत सुविधांअभावी रेशीम उत्पादक अडचणीत 
मुख्य बातम्या

पायाभूत सुविधांअभावी रेशीम उत्पादक अडचणीत

टीम अॅग्रोवन

बीड : रेशीम कोष उत्पादन वाढीसाठी महारेशीम अभियान आले. परंतु क्षेत्र वाढत असताना पूर्वीच्या समस्या सुटण्याऐवजी त्यामध्ये वाढच होते आहे. वाढत्या समस्या सोडविण्यात रेशीम विभाग सातत्याने अपयशी ठरत असल्याने बीड जिल्ह्यातील रेशीम कोष उत्पादकांनी प्रमुख सात मागण्यांसाठी शुक्रवारी (ता. १४) लाक्षणिक उपोषणाचा इशारा दिला आहे. 

या संदर्भातील अधिक माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील रेशीम कोष उत्पादकांच्या समस्येबाबत वारंवार पत्रव्यवहार केल्यानंतरही समस्यांची सोडवणूक करण्यासाठी रेशीम विभागाकडून पावले उचलली गेली नाही.

 दुष्काळातही शाश्वत उत्पन्न व चांगला दर मिळत असल्याने रेशीम विभाग व शासनाकडून मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागात महारेशीम अभियानाच्या माध्यमातून रेशीम उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न केले गेले. असे प्रयत्न व्हायला हवे यामध्ये दुमत नाही. 

परंतु मोठ्या प्रमाणात अभियानातून नव्याने रेशीमकडे वळलेल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आवश्‍यक यंत्रणा व पायाभूत सुविधा देण्याचे काम रेशीम विभागाकडून वा शासनाकडून का केले गेले नाही, असा प्रश्न रेशीम कोष उत्पादक शेतकऱ्यांनी केला आहे.

रेशीम विभागाकडे वाढलेल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पुरेशी यंत्रणा नाही. शेतकऱ्यांची संख्या वाढली. पण त्यांना उत्पादनासाठी अंडीपुंजच मिळाले नाही. त्यामुळे तुतीच्या बागा मोडाव्या लागल्या. इतर राज्याप्रमाणे प्रतिकिलो कोष उत्पादनामागे अनुदानाचा प्रश्न कायम आहे. अनेक समस्या व पायाभूत सुविधांचा प्रश्न कायम असतांना क्षेत्रवाढीसाठी प्रयत्न करण्याचे कोडे आम्हा उत्पादकांना काही उलगडेना.  - राहुल चव्हाण, रेशीम कोष उत्पादक, उदंडवडगाव, जि. बीड.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

Interview with Dashrath Tambale, Director of Atma : सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेतीची सक्ती नाहीच...

Rural Story : जागरण

Sugarcane Management : खोडवा उसाचे व्यवस्थापन

SCROLL FOR NEXT