पदविकाधारकांना खासगी  पशुवैद्यकीय व्यवसाय करू द्या  Private to diploma holders Let's do veterinary business
पदविकाधारकांना खासगी  पशुवैद्यकीय व्यवसाय करू द्या  Private to diploma holders Let's do veterinary business 
मुख्य बातम्या

पदविकाधारकांना खासगी पशुवैद्यकीय व्यवसाय करू द्या 

टीम अॅग्रोवन

अकोला : दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन व पशुसंवर्धन पदविकाधारकांना खासगी पशुवैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी नोंदणीकृत करण्याच्या प्रमुख मागणीसाठी विदर्भ व्हेटरनरी अँण्ड डेअरी डिप्लोमा होल्डर्स ऑर्गनायझेशनच्या वतीने सोमवारी (ता. २) जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन देण्यात आले. या वेळी माजीमंत्री दशरथ भांडे उपस्थित होते.  संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे, महाराष्ट्रातील दुग्ध व्यवसाय व पशुसंवर्धन पदविकाधारकांना सरकारी नोकरी नसली तरी खासगी पशुवैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी अधिकृत नोंदणी मिळावी, महाराष्ट्रात पदविकाधारकांचे हित व संरक्षण जोपासण्यासाठी स्वतंत्र राज्यस्तरावर व्हेटरनरी कौन्सिल स्थापन करून त्या परिषदेमध्ये शासकीय व अशासकीय सदस्यांची निवड करावी. निवड करताना सरकारी नोकरी नसलेल्या पदविकाधारकांची निवड करावी. महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठामार्फत सध्या सुरू असलेल्या पदविका अभ्यासक्रमात आमूलाग्र बदल करून सेमी इंग्रजी माध्यमातून १२ वी सायन्स नंतर किमान तीन वर्षांचा अभ्यासक्रम तयार करून संबंधितांना बीएव्हीएससी अँण्ड एएच पदवी अभ्यासक्रमाला द्वितीय वर्षात प्रवेश मिळावा. त्यासाठी दहा टक्के राखीव जागा ठेवाव्यात, अशा मागण्या शासनाकडे करण्यात आल्या आहेत. संघटनेचे अध्यक्ष हरीराम भांडे यांच्या मार्गदर्शनात जिल्हाध्‍यक्ष सुजित बनोले, उपाध्यक्ष अमोल नवले, हरीश चोपडे, विशाल येवकार, अमोल मुगल, योगेश इंगळे, एकनाथ निघोट, संदीप गावंडे यांच्यासह असंख्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या तापमानात जनावरांचे व्यवस्थापन

Lok Sabha Elections : चुरशीने मतदान; सकाळी ९ पर्यंत कोल्हापूर ८.०४ टक्के तर हातकणंगले ७.५५ टक्के मतदानाची नोंद

Fish Farming : पुनर्वसनग्रस्ताला मिळाला मत्सशेतीतून मोठा आधार

Turmeric Farming : हळदीची वाढली उत्पादकता

Farmer As Life Partner : आदर्शवत विवाहसोहळा

SCROLL FOR NEXT