Private cotton shop closed with Marketing Federation, CCI in Parbhani
Private cotton shop closed with Marketing Federation, CCI in Parbhani 
मुख्य बातम्या

परभणीत पणन महासंघ, सीसीआयसह खासगी कापूस खरेदी बंदच

टीम अॅग्रोवन

परभणी : लॅाकडाऊनमुळे राज्य कापूस उत्पादक सहकारी पणन महासंघ (फेडरेशन), भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) आणि खासगी व्यापाऱ्यांकडून कापूस खरेदी बंद आहे. उन्हाचा चटका वाढत आहे. त्यामुळे दर वाढतील या अपेक्षेने घरात कापूस साठवून ठेवलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कापूस खरेदी सुरु होण्याच्या हालचाली दिसत नसल्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. तत्काळ ही खरेदी सुरु करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.

शुक्रवार (ता.२० मार्च) पर्यंत जिलह्यात १९ लाख ६१ हजार १४० क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. त्यात पणन महासंघाची ४ लाख ७८ हजार ६६५ क्विंटल, सीसीआयची ८ लाख ८८ हजार ४९२ क्विंटल, तर खासगी व्यापाऱ्यांच्या ५ लाख ९३ हजार ९८३ क्विंटल कापूस खरेदीचा समावेश आहे. रुईच्या गाठी तसेच सरकी साठविण्यासाठी जागा नसल्यामुळे महासंघाच्या कापूस खरेदीत अडथळे येत गेले. खुल्या बाजारातील दरात घसरण झाल्यामुळे पणन महासंघ आणि सीसीआयच्या खरेदी केंद्रांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मोजमापास विलंब होत असल्याने वाहन भाड्याचा भुर्दंड शेतकऱ्यांना बसला. 

खासगी खरेदी देखील गेल्या पंधराहून अधिक दिवसांपासून बंद आहे. अनेक शेतकऱ्यांनी दरात सुधारणा होऊन फायदा होईल, या अपेक्षेने घरांमध्ये मोठ्या प्रमाणावर कापूस साठवून ठेवलेला आहे. परंतु, आता तापमानात वाढ झाल्यामुळे ते धोकादायक झाले आहे. पणन महासंघ आणि सीसीआयकडून कापूस सुरु करण्याबाबत हालचाली दिसत नाहीत. खासगी कापूस विक्री सुरु झाली नाही.    साडेतीन हजार शेतकऱ्यांची नोंदणी 

पणन महासंघाच्या खरेदी केंद्रांवर कापूस विक्री करण्यासाठी नोंदणी करावी लागत आहे. परभणी बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील १२५ गावांतील शेतकऱ्यांची नोंदणी तीन दिवस सुरु होती. त्यावेळी सुमारे साडेतीन हजारांवर शेतकऱ्यांनी नोंदणी केली. लॅाकडाऊनमुळे नोंदणी बंद आहे. अन्य ठिकाणच्या बाजार समित्यात नोंदणी सुरु नाही.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Rate : कांदा पुन्हा गडगडला

Lok Sabha Election 2024 : बारामतीकरांचा कौल मतपेटीत बंद

LokSabha Election : मावळात मशाल पेटणार की धनुष्यबाण चालणार?

Loksabha Election 2024 : अकरा मतदार संघांतील उमेदवारांचे भवितव्य ‘बंद’

PDKV Seed Research Centre : ‘पंदेकृवि’चे बियाणे संशोधन केंद्र ठरले राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट

SCROLL FOR NEXT