spain princess
spain princess 
मुख्य बातम्या

स्पेनच्या राजकन्येचा कोरोनामुळे मृत्यू; राजघराण्यातील पहिला बळी

वृत्तसेवा

माद्रीद : स्पेनच्या राजकन्या मारीया टेरेसा यांचा रविवारी (ता.२९) कोरोनामुळे मृत्यू झाला. स्पेनमध्ये सध्या कोरोनाने उद्रेक मांडला असून, आठ हजारांहून अधिक लोक मृत्यूमुखी पडले आहेत. त्यात राजघराण्यातील पहिल्याच व्यक्तीचा या रोगामुळे मृत्यू झाला.

स्पेनच्या राजाची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली होती. मात्र राजकन्या यातून वाचू शकली नाही. ८६ वर्षीय असलेल्या मारीया या स्पेनचे राजे फिलीफ सहावे यांच्या चुलतबहीण होत्या. याबाबत सोशल मिडीयावर त्याांचे भाऊ राजपुत्र सिक्थो अॅड्रीक्यू बार्बन यांनी सांगितले या निधनाची माहिती दिली.  मारिया या पॅरीसमध्ये मृत्यू पावल्या.

हा विषाणू श्रीमंत आणि गरिब यांच्यात फरक करत नसल्याचे यामुळे पुन्हा स्पष्ट झाले. राजकीय नेत्यांनाही या विषाणून सोडले नाही. इंग्लडचे राजे चार्ल्स, पंतप्रधान, आरोग्यमंत्री यांनाही या विषाणूची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. हा विषाणू चीननंतर युरोपातील इटली आणि स्पेन या देशांत मोठ्या प्रमाणात पसरला आहे. इटलीमध्ये दहा हजारांहून अधिक जणांचा या विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. स्पेनमध्ये कोरोनामुळे ५६९० जणांना यामुळे जीव गमवावा लागला. अमेरिकेत एक लाख वीस हजार लोकांना याची लागण झाली आहे. तेथेही मृत्यूचे प्रमाण वाढत आता दोन हजारांवर पोहोचले आहे.

स्पेनच्या पंतप्रधानांनी सध्याची तीन आठवड्यांचा लॉकडाऊन आणखी पुढे दोन आठवड्यांनी वाढवला आहे. अत्यावश्यक सेवांतील कर्मचाऱ्यांशिवाय इतरांनी पुढील दोन आठवडे घरीच राहण्यास सांगितले आहे. २८ मार्च रोजी स्पेनमध्ये ८३२ जणांचा चोवीस तासांत मृत्यू झाला. स्पेनमधील रुग्णालये आणि दफनभूमीतील कर्मचाऱ्या सध्या फार मोठ्या ताणात काम करत आहे. गेल्या चोवीस तासांत कोरोनाबाधितांची संख्या ६४ हजार०५९ वरून ७२ हजार २४८ पर्यंत पोहोचली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या उष्णतेचा पशुधनास फटका

Public Well Policy : सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर धोरण काय?

Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

Jalgaon Lok Sabha : ...तर जळगावचे चार खासदार पोहोचतील लोकसभेत

Banana Orchard Burn : सातपुड्याच्या पायथ्याशी केळी बागा करपल्या

SCROLL FOR NEXT