दर्यापूर बाजार समितीत सोयाबीनला सात हजाराचा भाव The price of soybean in Daryapur market committee is seven thousand
दर्यापूर बाजार समितीत सोयाबीनला सात हजाराचा भाव The price of soybean in Daryapur market committee is seven thousand 
मुख्य बातम्या

दर्यापूर बाजार समितीत सोयाबीनला सात हजाराचा भाव

टीम अॅग्रोवन

अमरावती : सोयाबीन दरातील तेजीची घौडादौड कायम असून शुक्रवारी (ता. नऊ)  दर्यापूर बाजार समितीमध्ये चांगल्या प्रतीच्या वीस क्विंटल सोयाबीनला विक्रमी सात हजार रुपये भाव मिळाला.  बाजार समितीमध्ये हलक्या प्रतीच्या सोयाबीनचे व्यवहार पाच हजार रुपयांनी झाले, अशी माहिती बाजार समिती सूत्रांनी दिली. 

या वर्षी बाजारात सोयाबीन बियाणे यांचा तुटवडा उद्भवण्याची  शक्यता आहे. त्यामुळे चांगल्या प्रतीचे सोयाबीन खरेदी करून त्याचा बियाण्यांकरिता उपयोग करण्याचे नियोजन अनेकांनी केले आहे. त्यामुळे चांगल्या प्रतीचे सोयाबीन बाजारात येताच त्याला दरही चांगला मिळत आहे. परिणामी विदर्भातील सर्वच बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे दर पाच हजार ते सहा हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत पोचले आहेत.

अकोला, वाशीम, अमरावती या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला उच्चांकी सहा हजार रुपये क्विंटलपर्यंत दर मिळत आहे. अकोला, वाशिम या बाजार समिती सोयाबीन खरेदी विक्री करता मुख्य बाजारपेठा ओळखल्या जातात. अमरावती,  नागपूर बाजार समित्यांमध्ये देखील सोयाबीनची मोठी आवक होते. या सर्वच बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे दर सहा हजार रुपयांच्या पुढे गेले आहेत. परिणामी शेतकरी सुखावले आहेत.

सोयाबीनचा तुटवडा पाहता बियाणेकामी लागणारे सोयाबीन उपलब्ध होण्यात या वर्षी मोठी अडचण निर्माण होणार आहे. त्यामुळे बियाण्यांकरिता लागणाऱ्या सोयाबीनला वाढती मागणी असून, दरही चांगला मिळत आहे. दर्यापूर बाजार समितीत सोयाबीनला यावर्षीचा सर्वात उच्चांकी सात हजार रुपये क्विंटल असा दर मिळाला. मात्र अवघ्या वीस क्विंटल सोयाबीनसाठी हा दर होता, अशी माहिती बाजार समिती सूत्रांनी दिली. बाजारात शुक्रवारी शंभर क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. उर्वरित सोयाबीनचे व्यवहार पाच हजार ते सहा हजार रुपये क्विंटल या दरम्यान झाले.

प्रतिक्रिया बाजार समितीमध्ये शुक्रवारी शंभर  क्विंटल सोयाबीनची आवक झाली. त्यातील अवघ्या वीस क्विंटल चांगल्या प्रतीच्या सोयाबीनला सात हजार रुपये इतका विक्रमी दर मिळाला आहे. उर्वरित सोयाबीनचे व्यवहार पाच हजार रुपये ते सहा हजार रुपये क्विंटलने झाले. सोयाबीनची प्रत पाहून दर व्यापाऱ्यांकडून दिला जात आहे.  - हिम्मत मातकर, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, दर्यापूर  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Stamp Duty : सातारा जिल्ह्यात पीककर्जासाठी ‘मुद्रांक शुल्क’ माफ

Onion Market : कांदा दरात घसरणीने उत्पादक अडचणीत

Water Scarcity : लोणी भापकर योजनेमुळे आठ गावे अन् ७८ वाड्या होणार टंचाईमुक्त

Co-operative Society : विकास सेवा सोसायट्यांवर आता ‘सीसीटीव्ही’चा ‘वॉच’

Silver Rate : चांदी दरात १४०० रुपयांची वाढ

SCROLL FOR NEXT