किसान लाँग मार्चला जाणाऱ्या शेतकऱ्यांना रोखले
किसान लाँग मार्चला जाणाऱ्या शेतकऱ्यांना रोखले 
मुख्य बातम्या

किसान लाँग मार्चला जाणाऱ्या शेतकऱ्यांना रोखले

टीम अॅग्रोवन

धुळे  : किसान लाँग मार्चमध्ये सहभागी होण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांची सोमवारी (ता.१८)  धुळ्यात धरपकड करण्यात आली. सत्यशोधक शेतकरी सभेचे नेते किशोर ढमाले, सुभाष काकुस्ते, मेरुलाल पावर, वंजी गायकवाड, यशवंत माळचे यांना दहिवेलमधील सत्यशोधक लाल बावटा कार्यालयातून  सोमवारी धुळे पोलिसांनी अटक केली. या प्रकाराचा सत्यशोधक शेतकरी सभेच्या कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध केला आहे.    सत्यशोधक शेतकरी सभेने बुधवारी (ता.२०) किसान सभेच्या नाशिक येथून निघणाऱ्या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी पिंपळनेर (ता. साक्री, जि. धुळे) येथून नाशिक आणि पुढे मुंबईपर्यंत पायी मोर्चा काढण्याचा निर्धार केला होता. त्यानुसार हजारो शेतकरी पिंपळनेर येथे एकत्र आले. लागलीच पोलीस आले, त्यांनी लाल बावटा कार्यालयात सत्यशोधक नेत्यांशी सुमारे अडीच तास चर्चा केली. त्यानंतर तुम्हाला मोर्चा काढता येणार नाही, असे सांगून पोलिसांनी किशोर ढमाले, सुभाष ककुस्ते, वांजी गायकवाड, यशवंत माळचे, मेरूलाल पवार ताब्यात घेतले आणि नंतर सोडून दिले. मग कष्टकरी शेतकऱ्यांचे आंदोलन हाणून पाडण्याचे हे कारस्थान आहे. ही लोकशाही मार्गाने आंदोलने करणाऱ्यांवरील दडपशाही आहे, असे म्हणत सत्यशोधक कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध  केला. दहिवेल येथील सत्यशोधक कार्यालयातून प्रमुख कार्यकर्त्यांना अटक केल्यानंतर तेथून १५ किलोमीटरवर पिंपळनेर येथे मनसाराम पवार, दीपक जगताप, जितेंद्र पवार, माळचे, जीवन गावित यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. अखेर ३००० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. दुसरीकडे मात्र अटक केलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांशी दुष्काळ, वनहक्क, रोजगार आदी प्रश्नांवर जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली, अशी माहिती मिळाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rice Research : अधिक ‘बी१’ जीवनसत्त्व असलेला भात विकसित

Waghad Project : ‘वाघाड’ने घडविला कायापालट

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

SCROLL FOR NEXT