Presence of rain all over Satara district
Presence of rain all over Satara district 
मुख्य बातम्या

सातारा जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी

टीम अॅग्रोवन

सातारा ः जिल्ह्यात सोमवारी सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे पिके आडवी झाल्याने नुकसान झाले आहे. जिल्ह्यात सरासरी ४.२४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. खरिपाच्या तोंडावर सलग दुसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावल्याने पेरणीपूर्व कामांना गती येणार आहे.

जिल्ह्यात सोमवारी सकाळपासूनत ढगाळ वातावरण झाले होते. काही ठिकाणी अधुनमधून हलक्या सरी येत होत्या. त्यानंतर सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने सुरुवात केली. कऱ्हाड तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी दमदार पाऊस झाला आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक घराचे तसेच पिकांचे नुकसान झाले आहे. या तालुक्यात २४ तासांत २५.५४ मिलीमीटर पाऊस झाला आहे. अनेक शेतात पाणी साचले आहे.

तसेच सातारा, जावळी, पाटण, खटाव, माण, महाबळेश्वर याही तालुक्यांत काही ठिकाणी दमदार पाऊस झाला आहे. माण, खटाव या दुष्काळी तालुक्यात पाऊस झाल्याने टंचाई कमी होण्यास मदत होणार आहे. कोरेगाव, फलटण, खंडाळा, वाई या तालुक्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे उभ्या पिकांचे नुकसान झाले असलेतरी खरिपाच्या दृष्टीने हा पाऊस फायदेशीर ठरणार आहे. ऊस, आले लागवडीसह पेरणीपूर्व कामांना गती येणार आहे.

तालुकानिहाय पाऊस मिलिमीटरमध्ये सातारा-११.०६, जावली-९.५३, पाटण-९.५५, कऱ्हाड- २५.५४, कोरेगाव-६.३३, खटाव-१०.२९, माण-१३.१४, फलटण-४.००, खंडाळा-१.७५, वाई-४.००, महाबळेश्वर-१३.२५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Delhi Farmers' protest : भाजपच्या उमेदवारांविरोधात पंजाबमध्ये शेतकऱ्यांचा रोष वाढला; एसकेएमचा विरोध कायम

Lok Sabha Constituency : कोल्हापूर जिल्ह्यातील ३७ लाख ५० हजार मतदारांचा कौल कोणाला? मतदान केंद्रे सज्ज

Fire in Nainital : उत्तराखंडच्या जंगलातील आग पोहचली शेताच्या बांधावर, एका महिलेचा होरपळून मृत्यू

Animal Ear Tagging : ...अन्यथा भरपाई अन् अनुदान नाही

Sunburn Crop : कोवळी रोपे वाचविण्यासाठी शेतकरी सरसावला

SCROLL FOR NEXT