Pre-monsoon rains hit to Igatpuri taluka
Pre-monsoon rains hit to Igatpuri taluka 
मुख्य बातम्या

इगतपुरी तालुक्याला पूर्वमोसमी पावसाचा फटका 

टीम अॅग्रोवन

नाशिक : जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून पूर्व मोसमी पावसाने दाणादाण उडवली आहे. रविवारी (ता.२) प्रामुख्याने इगतपूरी तालुक्यातील पूर्व भागात सलग तिसऱ्या दिवशी गारपीट झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचे भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर पूर्ण हंगामातील नियोजन कोलमडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 

इगतपुरी तालुक्यातील उत्तरपूर्व भागात वादळी वाऱ्यासह दुपारी २ वाजेनंतर सायंकाळी ६ वाजेपर्यंत पूर्वमोसमी पाऊस व गारपिटीमुळे मोठे नुकसान झाले. टोमॅटो, काकडी, वांगी,कांदा या चालू भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. यासह विटभट्ट्यांचे नुकसान झाले. तालुक्यात सर्वदूर पाऊस झाला. सर्वाधिक नुकसान नांदूर वैद्य, अस्वली स्टेशन, बेळगाव कुऱ्हे, नांदूर, साकुर, शेणीत, बेलू, वाघेरे, समनेरे, मोगरे,गोंदे, वाडीवऱ्हे परिसरात झाले. ज्या शेतकऱ्यांनी कांदा काढून ठेवला, तो भिजला आहे. 

जिल्ह्याच्या अनेक भागात पूर्व मोसमी पावसामुळे वातावरण तयार झाले होते. जिल्ह्याच्या पूर्व भागात येवला व निफाड तालुक्‍यातील वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसला. पाटोदा, शेवगे, एरंडगाव, साताळी, भिंगारे, निमगाव मढ परिसरात वादळी वाऱ्यामुळे नुकसान झाले. काढलेल्या कांद्याच्या पोळी शेतात झाकलेल्या होत्या. यावरील ताडपत्र्या उडून गेल्या. त्यामुळे कांदा भिजून नुकसान झाले. काही भागात शेतकऱ्यांचे पत्र्याचे शेड सोडून नुकसान झाले. 

नांदगाव तालुक्याच्या पूर्व भागात बोलठाण, जातेगाव परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा कांदा भिजला. बोलठाण येथील नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारात एका व्यापाऱ्यांचे शेड वादळी वाऱ्यामुळे पडले. शेडमध्ये पाणीपाणी झाले. त्यामुळे प्रतवारी केलेला कांदा मोठ्या प्रमाणावर भिजला. 

सिन्नर तालुक्यातील कांदा बियाणे डेंगळे लागवडीचे नुकसान झाले. टोमॅटो व भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. येवला, देवळा, सटाणा, कळवण व नाशिक शहरासह ग्रामीण भागात हलका तुरळक पाऊस होऊन नुकसान झाले आहे. 

इगतपुरी, येवला तालुक्यात वीज पडून जीवितहानी 

इगतपुरी तालुक्यातील खैरगाव येथील शिंदवाडी गावातील १९ वर्षीय तरूण अंगावर वीज पडल्याने जागीच ठार झाला. तर नांदूरवैद्य येथील उत्तम यंदे यांच्या गोठ्यातील दोन दुभत्या म्हशींवर विज कोसळली. बदापूर येथे अप्पा चांगदेव मोरे यांच्या गायीचा वीज पडून मृत्यू झाला.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या उष्णतेचा पशुधनास फटका

Public Well Policy : सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर धोरण काय?

Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

Jalgaon Lok Sabha : ...तर जळगावचे चार खासदार पोहोचतील लोकसभेत

Banana Orchard Burn : सातपुड्याच्या पायथ्याशी केळी बागा करपल्या

SCROLL FOR NEXT