Pre-monsoon rains in Aurangabad, Jalna district, impact on crops
Pre-monsoon rains in Aurangabad, Jalna district, impact on crops 
मुख्य बातम्या

औरंगाबाद, जालना जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व पावसाचा  फळे, पिकांवर आघात 

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील काही भागात मॉन्सूनपूर्व पावसाचे आक्रमण सुरूच आहे. वादळ व विजांच्या कडकडाटासह आलेल्या या पावसाने आंब्यासाह, मोसंबी डाळिंब आदी फळबागांचे नुकसान झाले. अंगावर वीज पडून मृत्यू होण्याच्या घटनाही रविवारी (ता.२) घडल्या. 

औरंगाबाद जिल्ह्यातील करमाड व परिसरात रविवारी (ता.२) सायंकाळी जोरदार वाऱ्या‍सह झालेल्या पावसात जयपूर (ता. औरंगाबाद) येथे वीज पडून दोन जणांचा मृत्यू झाला. सुनील त्रिगोटे व प्रकाश शिंदे (मसनतपुर, चिकलठाणा) असे दोघे जण मृत्युमुखी पडले. वीज कोसळल्याचा मोठा आवाज झाल्याने घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली. 

औरंगाबाद जिल्ह्यातील लोणी खुर्द, वेरुळ, हतनूर (ता.कन्नड),नागापूर परिसरात वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. टाकळी राजेराय (ता.खुलताबाद) सह भगतवाडी, ममनापूर, भडजी परिसरात पावसाच्या हलक्या सरी पडल्या. शिवना परिसरात सलग दुसऱ्या दिवशीही पावसाची फटकेबाजी सुरू होती. टाकळी राजेराय (ता. खुलताबाद) पिरबावडा, (ता.फुलंब्री) येथे मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. 

सोयगाव परिसरात दुपारी तीन वाजेनंतर जरंडी, निंबायती, कवली, बहुलखेडा, निमखेडी, रामपुरातांडा, माळेगाव, पिंपरी, घोसला आदी गावांना वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने तडाखा दिला. ग्रामीण भागात घरांवरील पत्रे उडाले. जरंडी, निंबायती आणि बहुलखेडा या भागात पावसाचा जोर अधिक होता. त्यामुळे रस्त्यावर पाणीच पाणी साचले. लिंबेजळगाव येथे जवळपास वीस मिनिटं जोरदार पाऊस झाला. 

जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यात पावसाने अक्षरशः थैमान माजविले. काही ठिकाणी गारपीटही झाल्याने फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. बदनापूर शहरासह तालुक्यात दोन दिवसांच्या ढगाळ वातावरणानंतर रविवारी सायंकाळी वादळीवारे व विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. नजीकपांगरी येथे वीज पडल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यूही झाला आहे.

तालुक्यातील भराडखेडा, सागरवाडी आदी भागात बेमोसमी पावसासह गारपिटीची घटनाही घडली. यात आंबा, मोसंबी, डाळिंब, जांभूळ, सीताफळ आदी फळबागांचे अतोनात नुकसान झाल्याची माहिती युवासेनेचे जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे व सागरवाडी येथील शेतकरी विशाल जारवाल यांनी दिली. 

बदनापूर शहरासह परिसरात विजेच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासह तब्बल दोन तास पाऊस झाला. त्यामुळे शहरातील अनेक घरांवरील पत्रे उडून गेले. शिवाय सखल भागात पाऊस साचला होता. प्रशासनाने तातडीने नुकसानग्रस्त क्षेत्राची पाहणी करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. 

दरम्यान घनसावंगी, केदारखेडा परिसरात वादळी वारे सुटले होते. वाटुरला विजेच्या कडाक्यासह पाउस झाला. कुंभरपिंपळगाव परिसरात संध्याकाळी पाऊस सुरु झाला होता. जांबसमर्थ परिसरात वादळी वारे सुटले होते. मंठा शहरात सायंकाळी सात वाजता जोरदार पाऊस झाला. तळणी परिसरात पावसाच शिडकाव तर विजांचा प्रचंड कडकडाट होता. 

लातूर जिल्ह्यात आंब्यांचे नुकसान 

लातूर जिल्ह्यातील रोहिणा परिसरात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात हलका ते मध्यम पावसाच्या सरी कोसळल्या. येरोळ, निलंगा, चाकूर परिसरात पाऊस झाला आहे. वडवळ नागनाथ परिसरात वादळी वारे आणि मेघगर्जनेसह दहा ते पंधरा मिनिट पाऊस झाला.विविध भागात वादळी पावसामुळे आंब्याचे मोठे नुकसान झाले.उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूरात, नायगावसह परीसरात पाऊस झाला. खामसवाडी परिसरात दुपारी तीन ते चार वाजता चांगला पाऊस झाला. नांगरटी साफ झाल्या. वाशी परिसरात रिमझिम पाऊस आहे. कसबेतडवळे येथे पाऊस झाला.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : विदर्भ, मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा

Pandharpur News : २ जूनपासून भाविकांना घेता येणार श्री विठ्ठल-रखुमाईचं पदस्पर्श दर्शन!

Summer Heat : दिवसा उकाडा, रात्री तडाखा

Soybean Seeds : उगवणशक्ती तपासूनच सोयाबीनचे घरचे बियाणे वापरावे

Water Crisis : महाडला पाणीटंचाईचे उग्ररूप

SCROLL FOR NEXT