देशी बियाणे
देशी बियाणे 
मुख्य बातम्या

देशी बियाण्यांच्या संवर्धनासाठी रंगणार ‘प्रकृती मेळा’

टीम अॅग्रोवन

पुणे : देशी बियाण्यांचे संवर्धन आणि प्रसारासाठी येथील राष्ट्रीय नैसर्गिक चिकित्सा संस्था आणि ‘अन्नदाता : नागरिकांची सुरक्षित अन्नासाठीची चळवळ’ या संस्थेच्या सहयोगाने प्रकृती मेळ्याचे १७ आणि १८ नोव्हेंबरला वाडिया कॉलेज येथे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून शेतकरी यात सहभागी होणार आहेत. शेती समृद्ध माती, पाणी, हवामान आणि बियाण्यांवर अवलंबून असते. यातच देशी बियाण्यांचे महत्त्व अधिक आहे. बदलत्या हवामानाला देशी बियाणे जास्त सुदृढपणे तोंड देऊ शकते. या मेळ्यात राज्यातील देशी बियाण्यांचे संवर्धन करणारे, सुरक्षित भाजीपाला पिकवणारे, पंचगाव्या, सुरक्षित अन्न बनवणाऱ्या शेतकऱ्यांचा समावेश असणार आहे. देशी बी संवर्धनात लोकपंचायत, कळसुबाई मिलेट, सेंद्रिय शेती अभ्यास गट(पाणी पंचायत), शाश्वत सेंद्रिय गट, बाएफ मित्र, सह्याद्री बी संघ अशी विविध गटही यात सहभागी होत आहेत. सुमारे ३०० पेक्षा जास्त जातीच्या बियाण्यांचा खजिना येथे उपलब्ध असेल. प्रत्येक गटाची देशी बियांची बँक त्या त्या गावात गेली बरीच वर्ष स्थित आहे. देशी बियांच्या संवर्धनासाठी प्रत्येक शेतकरी स्वत:हून सहभाग घेत आहेत. सेंद्रिय, सुरक्षित शेतीचा प्रसार ह्या सोहळ्याच्या निमित्ताने होणार आहे. महाराष्ट्रातील विविध शेतकरी सोहळ्याला भेट देऊन देशी बियांची खरेदी करू शकतात. पुणेकरांना सोहळ्यात भाजीपाला, फळे, धान्य, कडधान्ये, तृणधान्ये, विविध औषधी वनस्पती, मिलेट, वन्यफळे उपलब्ध होणार आहेत. १८ नोव्हेंबरला राष्ट्रीय नैसर्गिक चिकित्सा संस्थेतर्फे येणाऱ्या पर्यटकांना मिलेट जेवण मोफत देण्यात येणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Delhi Farmers' protest : भाजपच्या उमेदवारांविरोधात पंजाबमध्ये शेतकऱ्यांचा रोष वाढला; एसकेएमचा विरोध कायम

Lok Sabha Constituency : कोल्हापूर जिल्ह्यातील ३७ लाख ५० हजार मतदारांचा कौल कोणाला? मतदान केंद्रे सज्ज

Fire in Nainital : उत्तराखंडच्या जंगलातील आग पोहचली शेताच्या बांधावर, एका महिलेचा होरपळून मृत्यू

Animal Ear Tagging : ...अन्यथा भरपाई अन् अनुदान नाही

Sunburn Crop : कोवळी रोपे वाचविण्यासाठी शेतकरी सरसावला

SCROLL FOR NEXT