Of power lines in Akole Budruk The friction burned four acres of sugarcane 
मुख्य बातम्या

अकोले बुद्रूकमध्ये वीज तारांच्या घर्षणाने चार एकर ऊस जळाला

सोलापूरः विजेच्या खांबावरील विद्युत तारांचे घर्षण होऊन पडलेल्या ठिणग्यांमुळे चार एकर ऊस जळून खाक झाला.

टीम अॅग्रोवन

सोलापूर ः विजेच्या खांबावरील विद्युत तारांचे घर्षण होऊन पडलेल्या ठिणग्यांमुळे चार एकर ऊस जळून खाक झाला. ही घटना माढा तालुक्यातील अकोले बुद्रूक येथे घडली. यामध्ये तीन शेतकऱ्यांचे सुमारे सहा ते सात लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

अकोलेतील प्रभाकर शत्रुघ्न परबत, अरुण कुंडलिक कोथमिरे, उत्तम त्रिंबक ढवळे यांचा को ८६०३२ व को २६५ या जातीचा आडसाली लागवडीचा ऊस होता. कारखान्याकडे गळितास तोडून जाण्याच्या तयारीत असलेल्या उसाच्या वरील बाजूने, पंधरा ते सोळा वर्षांपूर्वीपासून बसवलेले विजेचे खांब व तारा आहेत.

गेल्या काही वर्षांपासून या वीजवाहिनींच्या तारा काहीशा सैल झाल्या आहेत. मोठ्याने वारा सुटला किंवा दहा-बारा पक्षी तारेवर बसले, तर त्या तारा एकमेकांना घासून ठिणग्या पडत होत्या. त्याच घर्षणाने हा ऊस अखेरीस जळाला. 

प्रभाकर परबत यांचा एक एकर, अरुण कोथमिरे यांचा दीड एकर आणि उत्तम ढवळे यांचा दीड एकर असा एकूण चार एकर ऊस जळाला आहे. जळीत ऊस हा विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना व माळी शुगर फॅक्टरी यांच्याकडे गळितासाठी नोंदणी केला आहे. भरपाईची मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drone Pilot Training: कृषी ड्रोन रिमोट पायलट प्रशिक्षण केंद्राला मंजुरी

Tur Cultivation: एआय तंत्रज्ञानावर तूर लागवड

Goras Bhandar Controversy: ‘गोरस भंडार’वरील कारवाई मागे घेण्याचे राज्य सरकारचे संकेत

Anna Hajare: माहिती अधिकारात बदल केल्यास आंदोलन; अण्णा हजारे यांचा सरकारला इशारा

Farmer Payment Delay: धान-मका उत्पादकांच्या ४२० कोटी रुपयांच्या चुकाऱ्यांची रखडपट्टी

SCROLL FOR NEXT