पोल्ट्री व्यावसायिक
पोल्ट्री व्यावसायिक  
मुख्य बातम्या

शासन हस्तक्षेपाची पोल्ट्री व्यावसायिकांची मागणी

टीम अॅग्रोवन

नागपूर ः खाद्याच्या दरात झालेली वाढ तुलनेत कमी मिळणारे दर यामुळे अडचणीत आलेल्या पोल्ट्री व्यावसायिकांनी शासनाच्या हस्तक्षेपाची मागणी करीत या उद्योगाला दिलासा देणारे पॅकेज जाहीर करण्याची मागणी केली आहे. पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांची या संदर्भाने भेट घेण्यात आली. त्या वेळी अनुदानावर पशुखाद्याचा पुरवठा व्हावा, अशी अपेक्षा पोल्ट्री व्यावसायिकांकडून व्यक्‍त केली गेली.  नॅशनल एग कॉर्डिनेशन कमिटी महाराष्ट्राचे अध्यक्ष श्याम भगत यांच्या नेतृत्वात पदाधिकाऱ्यांनी महादेव जानकर यांची भेट घेतली. या वेळी व्यवसाय करताना उद्भवणाऱ्या अडचणी मांडण्यात आल्या. त्यामध्ये नजीकच्या काळात पशुखाद्याच्या दरातील वाढीचा मुद्दा प्रकर्षाने मांडला गेला. श्रावण महिना त्यानंतर गणपती व इतर सण, उत्सव आल्याने अंड्यांची मागणी घटली आहे. ज्या प्रमाणात अंडी विकल्या जात आहेत. ती सरासरीच्या पाच टक्‍क्‍यांनी कमी आहेत. अंड्यांचा उत्पादकता खर्च ४ रुपयांपेक्षा अधिक तर दर तीन रुपये २० ते २५ पैसे इतके आहेत. त्यामुळे व्यवसायात ताळेबंद जुळत नसल्याचे सांगण्यात आले. शासनाने पोल्ट्री व्यावसायिकांना दिलासा देण्याकरिता पॅकेज जाहीर करावे किंवा अन्न व नागरी पुरवठा विभागाकडे असलेल्या धान्याचा अनुदानावर पुरवठा केला जावा, अशी मागणी करण्यात आली.  पुणे, सोलापूर, नाशिक, अलिबाग, रायगड हे पोल्ट्री व्यवसायाचे हब आहेत. परंतु त्याच ठिकाणी मोठ्या अडचणींचा सामना पोल्ट्री व्यावसायिकांना करावा लागत आहे. दरम्यान पशुसंवर्धनमंत्र्यांनी अनुदानावरील धान्य पुरवठ्यासंदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांचे निवेदन पुरवठा विभागाकडे पाठविले आहे. त्यावर लवकर तोडगा काढण्यात यावा, अशी मागणीदेखील करण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Farmer : निवडणूक काळात संत्रा उत्पादक उपेक्षित

Chara Chavani : चारा छावण्या सुरू करण्याची पशुपालकांची मागणी

Cotton Sowing : महाराष्ट्रात कापसाचा पेरा राहणार ४२ लाख हेक्टरवर

Animal Heat Stress : वाढत्या उष्म्याचा पशुधनाला धोका

Agriculture Technology : शेती तंत्रज्ञान, पिकांबाबत शेतकरी साक्षर असणे गरजेचे

SCROLL FOR NEXT