poultry  
मुख्य बातम्या

‘कोरोना’च्या अफवेमुळे पोल्‍ट्री उद्योगाचे १२० कोटींचे नुकसान

कोरोना विषाणूच्या भीतीने लोकांचे चिकन खायचे प्रमाण कमी झाले आहे. यामुळे चिकनची मागणी घटल्याने ७० ते ७५ रुपये जिवंत कोंबडीच्या खरेदीचे दर ४० रुपयांपर्यंत कमी झाले आहे. आठवड्याला चार कोटी जिवंत कोंबड्यांची विक्री १ कोटीने कमी झाली आहे. परिणामी, गेल्या १५ दिवसांत सुमारे १०० ते १२५ कोटींचे नुकसान झाले आहे. - कुणाल पाथरे, कार्यकारी संचालक,पोल्‍ट्री ब्रीडर ॲण्ड फार्मर वेलफेअर असोसिएशन

टीम अॅग्रोवन

पुणे ः चीनमधील कोरोना विषाणूने जगभरात भीतीचे वातावरण असताना या विषाणूचा फैलाव चिकनमधून होत असल्याच्या अफवा पसरल्या आहेत. परिणामी चिकनची मागणी घटल्याने गेल्या २० दिवसांत पोल्ट्री उद्योगाला सुमारे १२० कोटींचा फटका बसला आहे, असा अंदाज पशुसंवर्धन विभागाने व्यक्त केला आहे. मात्र, याबाबत जनजागृती होत असल्याने गेल्या काही दिवसांपासून घटलेली मागणी वाढत असून, चिकनची बाजारपेठ पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. याबाबत पशुसंवर्धन अतिरिक्त आयुक्त डॉ. धनंजय परकाळे म्हणाले, ‘‘महाराष्ट्राची ब्रॉयलर चिकनची मागणी दिवसाला २ हजार ८०० टनांची आहे. मात्र, कोरोनो विषाणूबाबतच्या अफवेमुळे आणि समाजमाध्यमांमधील फिरणाऱ्या चुकीच्या माहितीमुळे गेल्या २० दिवसांत चिकनची मागणी ६०० टनांनी घटली आहे. यामुळे १३० रुपये प्रतिकिलोच्या बाजारभावानुसार गेल्या २० दिवसांत सुमारे १०० ते १२० कोटींचे नुकसान झाले आहे. मात्र, केंद्र आणि राज्य सरकारने या अफवांबाबत केलेल्या जनजागृतीमुळे बाजारपेठ पुन्हा पूर्वपदावर येत असून, गेल्या २० दिवसांत १ हजार ६०० टनांपर्यंत कमी झालेली मागणी आता २ हजार २०० टनांपर्यंत वाढली आहे. काही दिवसांत ही बाजारपेठ पूर्वपदावर येईल असे आम्ही प्रयत्न करीत आहोत.’’  लिफ्टिंग दर ४० रुपयांवर कोरोना विषाणूच्या अफवेमुळे गेल्या १५-२० दिवसांपासून चिकनची मागणी  ५० ते ६० टक्क्यांनी घटली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराची दररोजची मागणी सुमारे १५० ते २०० टन एवढी असते. ती मागणी आता १०० टनांपर्यंत घटली आहे. तर चिकनचे १८० रुपये असणारे दर आता १२० रुपये आहेत. तर आमच्या जिवंत कोंबडीचे खरेदीचे दर ७५ ते ८० रुपयांवरुन, ४० रुपये प्रति किलो पर्यंत झाले आहे. मात्र, कोंबडीपासून कोरोना विषाणूचा फैलाव होत नसल्याचे समोर येत असल्याने मागणी वाढायला सुरुवात झाली आहे, असे पुणे जिल्हा ब्रॉयलर असोसिएशनचे संचालक रूपेश परदेशी यांनी सांगितले. प्रतिक्रिया ‘कोरोना’च्या भीतीमुळे कोंबड्यांच्या मागणीबरोबरच दरदेखील घटले आहेत. माझा या महिन्यात १० हजार पक्षी विक्रीचा अंदाज होता. मात्र ७ हजारच विक्री झाली. तर, दर ५५ रुपये प्रति किलो अपेक्षित होता. आता ३० रुपये मिळत आहे. - संदीप येवले,  सांडगेवाडी, पलूस, जि. सांगली

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Review : दुष्काळी परिस्थितीचा आढावा; बीड जिल्ह्यात पालकमंत्री पवार यांच्या उपस्थितीत बैठक

Drought Management : दुष्काळाला सामोरे जातांनाकाटेकोर नियोजन करा; विभागीय आयुक्त जी.श्रीकांत : परभणीत आढावा बैठक

Mahagaon Sugarcane Harvesting : महागाव परिसरात हार्वेस्टरने ऊसतोड सुरू

AI In Agriculture : ‘एआय’च्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे दुष्काळातही फळबागांना संजीवनी; सातारा जिल्ह्यात कृषी विभागाचा उपक्रम

Soybean Price: येवला बाजारात सोयाबीनची भरारी; क्विंटलला ७ हजार २५१ रुपयांचा दर

SCROLL FOR NEXT