साक्री तालुक्यात दुष्काळाची शक्यता
साक्री तालुक्यात दुष्काळाची शक्यता 
मुख्य बातम्या

साक्री तालुक्यात दुष्काळाची शक्यता

टीम अॅग्रोवन

साक्री, जि. धुळे : पाण्याचे स्रोत आटत आहेत. पाऊस दिवसेंदिवस लांबत आहे. परिणामी, यंदा देखील तालुक्‍यात भयंकर दुष्काळी स्थिती निर्माण होण्याची शक्‍यता आहे. तालुका गंभीर दुष्काळाच्या छायेत असल्याचे दिसू लागले आहे. जुलै महिना अर्ध्याहून अधिक संपला आहे. अद्यापही दमदार पावसाने हजेरी लावली नसल्याने शेतकऱ्यांसह सर्वांमध्येच चिंतेचे वातावरण आहे. 

दिवसेंदिवस कमी होत असलेल्या पावसामुळे गेल्या ३-४ वर्षांपासून तालुक्‍याला दुष्काळाचा फटका बसतोय. यात गेल्या वर्षी अत्यंत कमी पाऊस झाला. यंदा मोठ्या प्रमाणात टंचाईच्या झळा बसल्या. अशातच यंदा समाधानकारक पाऊस होईल आणि टंचाई दूर होईल, ही अपेक्षा फोल ठरल्याचे चित्र सध्या आहे. परिस्थिती आणखीनच गंभीर बनत आहे.

आतापर्यंत केवळ ७२ मिमी

तालुक्‍यात आतापर्यंत केवळ सरासरी ७२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या १५ दिवसांत थेंबभर देखील पाऊस झाला नाही. या वर्षी समाधानकारक पाऊस पडेल, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी काही प्रमाणात पेरण्या केल्या. मात्र, पावसाअभावी ही पिके आता माना टाकायला लागली आहेत. निम्म्याहून अधिक भागात तर अद्याप पेरण्यांची कामे खोळंबली आहेत. एकूणच, यंदा देखील भीषण दुष्काळाच्या दुष्टचक्रात तालुका सापडण्याचीच शक्‍यता अधिक आहे.

कृत्रिम पावसाची मागणी 

सातत्याने दुष्काळाचे चटके सहन करणाऱ्या येथील शेतकऱ्यांमध्ये यंदा मोठी अस्वस्थता आहे. यंदा देखील दुष्काळाचा फटका बसला, तर करायचे काय, असा प्रश्न त्यांच्यासममोर आहे. आता किमान कृत्रिमरीत्या पाऊस पाडण्याचा प्रयत्न करावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. यासोबतच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न देखील आता गंभीर बनला आहे. तातडीने चारा छावण्या सुरू करण्याची मागणी देखील करण्यात येत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Rate : वाढत्या उन्हामुळे साखरेला मागणी, दरातही वाढ

Food Security Scheme : अन्नसुरक्षा योजनेत पुरवल्या अप्रमाणित निविष्ठा

Jowar Market : पंचवीस हजार क्विंटल ज्वारीची कमी दराने विक्री

Heat Wave Maharashtra : उन्हाच्या चटक्याने राज्य होरपळले

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

SCROLL FOR NEXT