Possibility of cotton cultivation on 4.5 lakh hectares in Yavatmal
Possibility of cotton cultivation on 4.5 lakh hectares in Yavatmal 
मुख्य बातम्या

यवतमाळमध्ये साडेचार लाख हेक्‍टरवर कपाशी लागवडीची शक्यता

टीम अॅग्रोवन

यवतमाळ : जिल्ह्यात खरीप हंगामात यंदा नऊ लाख हेक्‍टरवर पेरणी होण्याचा अंदाज आहे. यात तब्बल चार लाख ८० हजार हेक्‍टरवर कापसाच्या लागवडीची शक्‍यता आहे. बोंडअळीमुळे दोन वर्षांपासून बियाणे आणण्यापासून तर विक्रीपर्यंच्या तारखा निश्‍चित केल्या आहेत. यंदाच्या खरीप हंगामासाठी मंगळवार (ता. २६) पासून जिल्ह्यात बियाणे विक्रीला सुरुवात झाली आहे.

कापूस जिल्ह्यातील महत्त्वाचे पीक आहे. दरवर्षी कापसाच्या पेरणी क्षेत्रात वाढ होत आहे. त्यामुळे बियाण्याचे नियोजन करणे तसेच बियाणे उपलब्ध ठेवून हे अत्यंत महत्त्वाचा विषय कृषी विभागासमोर आहे. अशातच गेल्या दोन वर्षांपूर्वी आलेल्या बोंडअळीमुळे कंपनीतून कृषी सेवा केंद्र व त्याठिकाणाहून शेतकऱ्यांपर्यंत बियाणे पोहोचविण्याचे वेळापत्रक निश्‍चित करून दिले आहे. या वेळापत्रकानुसारच बियाणे विक्री होत आहे. मंगळवार (ता. २६) पासून जिल्ह्यात बियाणे विक्रीला कृषी सेवा केंद्रातून सुरुवात झाली आहे.

जिल्ह्याला आवश्‍यक असलेल्या कापूस बियाणे मुबलक प्रमाणात जिल्ह्यात उपलब्ध झालेले आहे. बियाणे विक्रीला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन कृषी तज्ज्ञांकडून केले जात आहे. या काळात पेरणी केल्यास गुलाब बोंडअळी परत येण्याची शक्‍यता जास्त असते. जिल्ह्यात यंदा नऊ लाख हेक्‍टरवर खरिपाची पेरणी होण्याची शक्‍यता आहे. यात सर्वाधिक चार लाख ८० हजार हेक्‍टर कापसाचा पेरा असणार आहे. दोन लाख ५० हजार हेक्‍टरवर सोयाबीन तर, एक लाख ५० हजार हेक्‍टरवर तूर पिकांचा पेरा होण्याचा अंदाज आहे. यासाठी आवश्‍यक असलेले बियाणे उपलब्ध असून, टंचाई येणार नसल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

शासनाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार बियाणे विक्री सुरू करण्यात आली आहे. मात्र, शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. जोपर्यंत शंभर मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस होत नाही. तोपर्यंत शेतकऱ्यांनी प्रतीक्षा करावी. - पंकज बरडे, जिल्हा कृषी विकास अधिकारी, यवतमाळ. 

५५ हजार टन खत उपलब्ध खरीप हंगामासाठी युरिया, एमओपी, एसएसपी, डीएपी, मिश्र खत अशा सर्व खतांची मागणी एक लाख ७२ हजार २६२ टन आहे. यातील एक लाख ६६ हजार ४७० टन आवंटन मंजूर झाले आहे. यातील आत्तापर्यंत जिल्ह्याला ५५ हजार टन खत उपलब्ध झाले आहे. येत्या काही दिवसांत जिल्ह्यासाठी आणखी रॅंक लागत असल्याने खतांचा पुरवठा वेळेत होणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Turmeric Production : हळद उत्पादन वाढीची सूत्रे

Mango Growing : आंबे पिकविण्याची स्वस्त, सुरक्षित पद्धत

Climate Change : हवामान बदलाचा फळबागेला जोरदार फटका

Indian Politics : गांधींचा वारसा, मोदींचा आरसा

Delhi Farmers' protest : शेतकरी आंदोलनाचा थर्मल प्लांटला फटका; कोळसा पुरवठा बंद, अनेक रेल्वे गाड्या रद्द

SCROLL FOR NEXT