तापमानात वाढ होण्याची शक्यता
तापमानात वाढ होण्याची शक्यता 
मुख्य बातम्या

तापमानात वाढ होण्याची शक्यता

टीम अॅग्रोवन

पुणे : राज्यात मंगळवारपासून बहुतांशी ठिकाणी कोरड्या हवामानाचा अंदाज अाहे. आकाशही मुख्यत: निरभ्र राहणाार असल्याने राज्याच्या तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तर मंगळवारी मध्य महाराष्ट्रात तर बुधवारी विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची अंदाज वर्तविण्यात आला आहे.  मागील अाठवड्यात राज्यात ढगाळ हवामानासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. दोन, ते तीन दिवस पूर्णपणे ढगाळ हवामान असल्याने राज्याच्या कमाल तापमानात मोठी घट झाली होती. अनेक ठिकाणी तापमानात सरासरीपेक्षा ५ ते १२ अंशांपेक्षा अधिक घट होत थंड दिवस अनुभवायला मिळाले. त्यानंतर शनिवारपासून तापमानात पुन्हा वाढ होऊ लागली आहे. सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये भिरा येथे राज्यातील उंच्चांकी ३९.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. रविवारी (ता. १८) दुपारनंतर मध्य महाराष्ट्रातील, नाशिक, नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी पडल्या. सोमवारी उत्तर मध्य महाराष्ट्रात समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार स्थिती होती. या स्थितीपासून मध्य राज्यस्थानपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा होता. तर पश्‍चिम किनाऱ्यावर पूर्व-मध्य अरबी समुद्रापासून केरळपर्यंत आणखी एक हवेच्या कमी दाबाचा पट्टा सक्रिय होता. यामुळे मध्य महाराष्ट्रात मंगळवारी आणि तर विदर्भात बुधवारी तुरळक पावसाचा अंदाज अाहे. तर कोकण, मराठवाड्यात हवामान कोरडे राहणार आहे. सामवारी (ता. १९) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३३.७, जळगाव ३७.६, कोल्हापूर ३२.४, महाबळेश्वर २८.३, मालेगाव ३७.०, नाशिक ३४.९, सांगली ३५.०, सातारा ३४.३, सोलापूर ३६.५, मुंबई ३१.०, अलिबाग ३०.१, डहाणू ३१.६, भिरा ३९.५, औरंगाबाद ३५.४, परभणी ३७.४, नांदेड ३७.०, अकोला ३८.०, अमरावती ३५.६, बुलडाणा ३६.०, ब्रह्मपुरी ३७.०, चंद्रपूर ३६.०, गोंदिया ३५.२, नागपूर ३५.६, वर्धा ३६.५, यवतमाळ ३५.०.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT