pomegranate 
मुख्य बातम्या

डाळींब व्यापाऱ्यांना पाठविणार थेट बांधावर 

संचारबंदीमुळे डाळिंब आणि भाजीपाला उत्पादक व्यापारी नसल्यामुळे अडचणीत आले आहेत. त्यांच्या मदतीसाठी बाजार समिती थेट शेतात व्यापारी पाठवणार आहे.

टीम अॅग्रोवन

आटपाडी, जि. सांगलीः संचारबंदीमुळे डाळिंब आणि भाजीपाला उत्पादक व्यापारी नसल्यामुळे अडचणीत आले आहेत. त्यांच्या मदतीसाठी बाजार समिती थेट शेतात व्यापारी पाठवणार आहे. शेतकऱ्यांकडे असलेल्या भाजीपाल्याची नोंद बाजार समितीकडे करावी, असे आवाहन बाजार समितीने केले आहे.  येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक पार पडली. यावेळी सभापती भाऊसाहेब गायकवाड, बाजार समितीचे संचालक पंढरीनाथ नागणे, सचिव शशिकांत जाधव यांच्यासह प्रमुख व्यापारी उपस्थित होते.  बैठकीत तालुक्‍यात सध्या उपलब्ध असलेल्या डाळिंब आणि भाजीपाला उत्पादनावर चर्चा झाली. तसेच ज्यांचे डाळिंब विक्रीसाठी आले आहेत असे शेतकरी आणि टोमॅटो, शेवगा, ढोबळी मिरची आणि कलिंगड याची लागवड केलेल्या शेतकऱ्यांनी बाजार समितीशी थेट संपर्क करून लागवडीचे आणि अंदाजे उत्पादन किती निघेल याची नोंद करण्याचा निर्णय घेतला. या नोंदीच्या आधारे या शेतकऱ्यांच्या बांधावर थेट व्यापाऱ्यांना पाठवण्याचे नियोजन बाजार समितीने केले आहे.  शेतकऱ्यांचा भाजीपाला सडून वाया जाऊ नये यासाठी त्यांना सहकार्य करण्यासाठी बाजार समितीने निर्णय घेतला आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी डाळिंब, टोमॅटो, शेवगा आणि ढोबळी मिरची याची नोंद करावी, असे आवाहन केले आहे.   

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT