pomegranate
pomegranate  
मुख्य बातम्या

दर वाढूनही नुकसानीमुळे डाळिंब उत्पादकांना फटका 

टीम अॅग्रोवन

सांगली ः देशातील मृग हंगामातील डाळिंब उत्पादन अंतिम टप्प्यात आले आहे. यंदा डाळिंबाला १५० ते २०० रुपये प्रतिकिलो दर मिळाला. गेल्या वर्षी हाच दर ३० ते ८० रुपये होता. यंदा दर चांगला मिळाला असला तरी पावसामुळे डाळिंबाचे मोठे नुकसान होऊन खर्चही तिप्पट झाला. त्यामुळे डाळिंब उत्पादकांना उत्पन्न आणि खर्चाचा मेळ घालण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. 

देशात डाळिंबाचे २ लाख २५ हजार हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी १ लाख २५ हजार हेक्टरवर मृग बहर धरला जातो. मात्र यंदाच्या ऐन हंगामाच्या वेळी सतत पाऊस झाला. वातावरणात बदल झाला. याचा फटका मृग हंगामातील डाळिंबाला बसला. परिणामी, फुलगळ, फळकुज मोठ्या प्रमाणात झाली. त्यामुळे मालाचा दर्जा घसरला. बागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना तिप्पट खर्च करावा लागला. खर्च करून देखील डाळिंबाच्या उत्पादनात सुमारे ८० ते ८५ टक्क्यांनी घटले. 

नैसर्गिक आपत्तीमुळे डाळिंबाचा तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे डाळिंबाच्या दरात सुधारणा होऊ लागली. हंगामाच्या प्रारंभी डाळिंबास प्रति किलोस १०० रुपयांपासून दर मिळू लागले. हळूहळू डाळिंबाच्या दरात वाढ झाली असल्याचे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले. गतवर्षी याच हंगामातील डाळिंबास प्रति किलोस ३५ ते ८० रुपयांपर्यंत दर मिळाले होते. यंदा डाळिंबास गतवर्षीपेक्षा चांगले दर मिळाले असले, तरी डाळिंब शेतीस घातलेला खर्चाचा ताळमेळ कसातरी बसला असून, ज्या शेतकऱ्यांच्या हाती डाळिंबाचे उत्पादनच मिळाले नाही, त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.  ..  देशातून मृग, अंबिया आणि हस्त या तीन बहारांतील डाळिंबाची सुमारे ७८ हजार टन डाळिंब निर्यात होते. यंदाच्या हंगामातील मृग बहरातील डाळिंब युरोपसह आखाती देशात आजअखेर २०० ते २५० टन निर्यात झाली आहे. अजून २०० ते २५० टन निर्यात होण्याची शक्यता असल्याचे डाळिंब अखिल भारतीय डाळिंब संघाच्या सूत्रांनी सांगितले.  निर्यात डाळिंबाचे दर १०० रुपयांनी वाढले  देशातून डाळिंबाची मोठ्या प्रमाणात निर्यात होते. गतवर्षी निर्यातक्षम डाळिंबास १०० ते १२० रुपये प्रति किलो असा दर मिळाला होता. यंदा निर्यातक्षम डाळिंबाच्या उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे १३० रुपयांनी दरात वाढ झाली आहे. सध्या या डाळिंबास २५० रुपये मिळत आहेत.  डाळिंब उत्पादन आणि दर (रुपये/किलो)  १५० ते २५०  स्थानिक डाळिंब  २५०  निर्यातीचा दर  २०० ते २५० टन  आतापर्यंत निर्यात  राज्यनिहाय डाळिंब उत्पादन अंदाजे (टनांत)  महाराष्ट्र  २०१९-२० :  १५ लाख   २०२०-२१ :  ५ लाख  

गुजरात  २०१९-२० :  ३ लाख  २०२०-२१ :  १.५ लाख 

कर्नाटक  २०१९-२० :  ५ लाख  २०२०-२१ :  २ लाख 

राजस्थान  १९-२० :  २ लाख  २०-२१ :  १.५ लाख 

आंध्र प्रदेश  १९-२० :  २ लाख  २०-२१ :  १ लाख  

प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी पावसातून बागा वाचविण्यासाठी धडपड केली. पावसाचे प्रमाण कमी असलेल्या भागात शेतकऱ्यांच्या हाती उत्पादन आले, पण उत्पादकता घटली. त्यामुळे शेतकरी अडचणीत आहेत.  - प्रभाकर चांदणे, अध्यक्ष, अखिल भारतीय डाळिंब संघ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT