डाळींब
डाळींब  
मुख्य बातम्या

सांगली जिल्ह्यात डाळिंबाला फळधारणाच झाली नाही

टीम अॅग्रोवन

सांगली ः दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना चार पैसे मिळवून देणाऱ्या डाळिंबावर आता नवीन संकट आले आहे. पावसाचा मोठा खंड, वाढते तापमान यामुळे गेल्या २२ वर्षांत यंदा प्रथमच दहा हजारहून अधिक एकरवरील डाळिंब बागांना फळधारणाच झाली नाही. ज्या झाडांना २०० ते २५० डाळिंबे लागायची तिथे फक्त १० ते १२ फळे लागली आहेत. फळधारणेसाठी शेतकऱ्यांनी दुप्पट-चौपट खर्च केला. मात्र, केलेला खर्च कसा मिळणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.  जिल्ह्यात मृग हंगामातील डाळिंब घेण्याचा कल अधिक असतो. शेतकऱ्यांनी जून महिन्यात डाळिंबाचा मृग बहर विकतचे पाणी टॅँकरने घालून धरला. दुष्काळी पट्ट्यातील आटपाडी, कवठेमहांकाळ आणि जत तालुक्यांत सध्या फक्त डाळिंब हेच नगदी पीक आहे. मात्र यंदा पावसात मोठा खंड पडल्याने डाळिंबाची अवस्था वाईट झाली. त्यात उन्हाळ्यात मे महिन्यात ४० अंशापेक्षा जास्त तापमान १५ दिवसांपेक्षा अधिक दिवस राहिले. त्यामुळे डाळिंबाचे फळधारणा होण्यासाठी अनुकूल वातावरण नाही. परिमाणी, डाळिंब उत्पादन घटण्याची शक्यता आहे.   यंदा प्रथमच फळधारणाच झाली नाही. बहर धरल्यावर कळी २२ व्या दिवशी झाडावर दिसते. तर ३५-३६ व्या दिवशी सेटिंग (फळधारणा) होते. सव्वा महिन्यात फलधारणा होणे अपेक्षित आहे. यंदा कळ्या लागतात; पण त्याला फळ लागण्याऐवजी फांदीवर हिरव्या काड्या म्हणजे फुटवा वाढत आहे. दरवर्षी खोडालाही फुटवा असतो. शेतकरी फळाचे अन्न फुटव्याला जाऊन झाड, फळे, अशक्त होऊ नयेत म्हणून काढतात. यंदा जूनपासून दर ११ व्या दिवशी फुटवा येतो. १५ व्या दिवशी शेतकरी काढतात. असे ७ ते ८ वेळा झाले आहे. नुसता खर्च वाढत आहे. डाळिंबाच्या प्रतिझाडाचा खर्च (रुपये)

छाटणी  ४०
फुटवा  ६० 
शेणखत १००
रासायनिक खते १००
मजुरी ४०
खुरपण  ५०
फवारण्या १५०
एकूण  ५४०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या उष्णतेचा पशुधनास फटका

Public Well Policy : सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर धोरण काय?

Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

Jalgaon Lok Sabha : ...तर जळगावचे चार खासदार पोहोचतील लोकसभेत

Banana Orchard Burn : सातपुड्याच्या पायथ्याशी केळी बागा करपल्या

SCROLL FOR NEXT