polyhouse
polyhouse  
मुख्य बातम्या

नगर जिल्ह्यातील पॉलिहाउसधारक बेदखल

टीम अॅग्रोवन

नगर ः जूनमध्ये आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने नगर जिल्ह्यातील सात तालुक्यांतील पॉलिहाउस, शेडनेटधारक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मात्र, महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळाने एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार हरितगृह, शे़डनेटला नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई दिली जात नाही. त्यामुळे नुकसानभरपाई संदर्भात कोणताही पत्रव्यवहार करू नये व आपल्या पातळीवर तक्रारदारांना मार्गदर्शन करावे, असे पत्र पाठवले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त पॉलिहाउस, शेडनेटधारक शेतकरी कृषी विभागाकडून बेदखल झाले आहेत.  एकट्या नगर जिल्ह्यात केवळ सहा तासांत पॉलिहाउस, शेटनेटचे तब्बल पावणेसात कोटींचे नुकसान झाले होते.  शेतकऱ्यांमध्ये पारंपरिक शेतीऐवजी संरक्षित शेतीसाठी गेल्या दहा वर्षांपासून जागृती केली जात आहे. कृषी विभागाकडून फलोत्पादन अभियानातून पॉलिहाउस, शेडनेट उभारणीसाठी शेतकऱ्यांना अनुदान दिले जात आहे. अधिकारी, शेतीमधील अभ्यासू लोकांचा आग्रह आणि दिलेल्या विश्वासातून अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पॉलिहाउस, शेडनेट उभारले. साधारण वीस गुंठ्याचे पॉलिहाउस उभारायला पंधरा लाखांपर्यंत खर्च येतो. त्यातील ५० टक्के अनुदान कृषी विभागाकडून मिळाले असले तरी पॉलिहाउस उभारणीतून अनेक तरुण कर्जबाजारी झाले. याच शेतकऱ्यांना निसर्ग चक्रीवादळामुळे मोठा फटका बसला. नगर जिल्ह्यातील सुमारे ३२५ पॉलिहाउसचे या चक्रीवादळामुळे सुमारे पावणेसात कोटींचे नुकसान झाले. प्रशासनाने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्यावेळी तात्पुरता दिलासा दिला खरा, मात्र एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार हरितगृह, शे़डनेटचे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास भरपाई दिली जात नाही. त्यामुळे नुकसान भरपाई संदर्भात कोणताही पत्रव्यवहार करू नये, असे पत्र पाठवण्यात आले आहे. त्यामुळे पॉलिहाउस, शेडनेटधारक शेतकरी कृषी विभागाकडून बेदखल असल्याचे स्पष्ट झाले आहे. पंचनाम्याचे केवळ सोपस्कर केले असले तरी नुकसान भरपाई मिळण्याबाबत नगर कृषी कार्यालयाने वरिष्ठ पातळीवर प्रस्तावच पाठवलेला नाही. त्यामुळे पॉलीहाउस, शेडनेटधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार नाही हे स्पष्ट झाले आहे.

असे आहे नुकसान (रुपये) (कंसात शेतकरी संख्या)

कोपरगाव एक कोटी ३६ लाख साठ हजार (८)
पाथर्डी   ६० लाख (३०)
अकोले १ कोटी ८२ लाख ४५ हजार (९३) 
राहाता  २४ लाख ८० हजार (२७) 
संगमनेर   १ कोटी ४३ लाख ९४ हजार (१००) 
नगर   ८० लाख (४५) 
नेवासा   २० लाख (८) 
पारनेर   २५ (१२)  

प्रतिक्रिया पॉलिहाउस, शेडनेट उभारण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले. मात्र नैसर्गिक आपत्तीने नुकसान झाले, तर मदत दिली जात नाही हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे. शासनाने नुकसानग्रस्त पॉलिहाउस, शेडनेटधारक शेतकऱ्यांना मदत करणे अत्यंत गरजेचे आहे.  - संपतराव गडाख, शेतकरी, सोनई, जि, नगर.

तरुण शेतकऱ्यांनी लाखो रुपये कर्ज काढून पॉलिहाउस, शेडनेटची उभारणी केली. मात्र अजूनही त्यांना मदत मिळालेली नाही. शासनाने कोणत्याही परिस्थितीत पॉलिहाउस, शेडनेटचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी.  - बलभीम पठारे, शेतकरी, देहेरे, जि. नगर.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : एप्रिलमध्ये पिकांचे २७ कोटींचे नुकसान

Agriculture Irrigation : आक्रोश मोर्चाचे रूपांतर उपोषणात

Cotton Cultivation : सरासरीच्या तुलनेत यंदा कपाशीची लागवड वाढणार

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

SCROLL FOR NEXT