cyclone
cyclone 
मुख्य बातम्या

पुणे जिल्ह्यात पॉलिहाऊसचे मोठे नुकसान

टीम अॅग्रोवन

पुणेः कोरोना टाळेबंदीमध्ये बाजार समित्यांसह वाहतुकी अभावी देशांतर्गत तसेच निर्यात बंदीमुळे पॉलीहाऊसधारक फुल उत्पादक अडचणीत सापडले आहेत. त्यातच आता निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यातील बहुतांश पॉलीहाऊसचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामुळे पॉलीहाऊसधारक शेतकरी आणखी अडचणीत आला आहे. चक्रीवादळाने अनेक पॉलीहाऊस जमीनदोस्त झाली असून, अनेक पॉलीहाऊसचे कागद फाटून उडून गेल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.  निसर्ग चक्रीवादळ बुधवारी (ता.३) दुपारपासून जिल्ह्यातील विविध भागात सक्रिय होऊन वादळी पाऊस सुरु झाला. यामध्ये विविध नुकसानीबरोबरच पॉलीहाऊसेसचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्‍ह्यात सर्वात जास्त पॉलीहाऊस मावळ तालुक्यात असून, मावळ तालुक्यासह तळेगाव येथील फ्लोरिकल्चर पार्क मध्ये असे एकूण सुमारे १ हजार २०० एकरवर पॉलीहाऊस आहेत. तर जिल्ह्यात शिरुर, जुन्नर, खेड, आंबेगाव, तालुक्यांसह भोर, बारामती, इंदापूर, दौंड परिसरात देखील पॉलीहाऊसेस आहेत. बुधवारी आलेल्या चक्रीवादळाने अनेक पॉलीहाऊसचे कागद फाटून उडून गेले आहेत.तर अनेक ठिकाणी पॉलीहाऊस सांगाड्यांसह जमीनदोस्त झाले आहेत.  याबाबत बोलताना पुणे जिल्हा फुल उत्पादक संघाचे अध्यक्ष शिवाजी भेगडे म्हणाले, ‘‘कोरोनामुळे फुल शेती गेल्या तीन महिन्यांपासून ठप्प असल्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. त्यातच बुधवारी झालेल्या चक्रीवादळाने बहुतांश सर्वच पॉलीहाऊसेसचे कमी अधिक प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये कागद फाटणे, संपूर्ण पॉलीहाऊस कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. आम्ही आजच संपूर्ण तालुक्यात नुकसानीची पाहणी केली असून, ९० टक्के पॉलीहाऊसेसचे नुकसान झाले आहे. माझे वैयक्तीक ३ कोटींच्या नुकसानीची भिती आहे.’’   तळेगाव फ्लोरिक्चर पार्कचे अध्यक्ष मल्हारराव ढोले म्हणाले, ‘‘वादळाने पॉलीहाऊसचे कागद उडून, आतील झाडांचे देखील नुकसान झाले आहे. यानुकसानीच्या माहितीचे संकलन करण्याचे काम सुरु आहे. दोन दिवसात नुकसानीचा आकड्याचा अंदाज येईल.’’  असे झाले नुकसान

  • पॉलीहाऊसचे कागद फाटून उडून गेले 
  • अनेक ठिकाणी पॉलीहाऊस सांगाड्यांसह जमीनदोस्त 
  • ९० टक्के पॉलीहाऊसेसचे नुकसानः जिल्हा फुल उत्पादक संघ
  • पॉलीहाऊसमधील झाडांचेही मोठे नुकसान
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

    MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

    Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

    Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

    Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

    SCROLL FOR NEXT