बैलांच्या सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली
बैलांच्या सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली 
मुख्य बातम्या

आंबेगाव तालुक्यात आज भाद्रपद बैलपोळा

सकाळ वृत्तसेवा

मंचर, जि. पुणे : आंबेगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये आज (ता. २८) भाद्रपद बैलपोळा साजरा होत आहे. त्या निमित्ताने मंचर, तळेघर येथे बैलांच्या सजावटीसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी बाजारपेठेत गर्दी केली होती. 

मंचर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शनिवारी मंचर, शेवाळवाडी, निघोटवाडी या तीन गावांच्या वतीने बैलपोळा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. उत्कृष्ट सजावट केलेल्या बैलजोड्यांच्या मालकांना मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. कलगीतुरा व सांस्कृतिक कार्यक्रमांचेही या वेळी आयोजन करण्यात आले आहे. 

या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने आपल्या ढवळ्या-पवळ्याला सजविण्यासाठी झूल, रंगीबिरंगी गोंडे, घंट्यांच्या माळा आदी साहित्य खरेदीसाठी शेतकऱ्यांनी बाजारात गर्दी केली होती. तसेच शहरात राहणाऱ्या नागरिकांकडून मातीची बैलजोडी खरेदी करण्यासाठी लगबग सुरू होती. २५ रुपयांपासून ते २०० रुपयांपर्यंत मातीच्या बैलांच्या किमती होत्या. भीमाशंकर परिसरातील तीस आदिवासी गावांतील शेतकरी तळेघर येथील बाजारात बैल सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी आले होते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT