शेतकरी आंदोलन दडपण्याचा डाव; किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांचा आरोप  Ploy to suppress peasant agitation; Kisan Sabha leader Dr. Allegation of Ajit Navale 
मुख्य बातम्या

शेतकरी आंदोलन दडपण्याचा डाव : डॉ. अजित नवले

आंदोलनात फूट पाडून आंदोलन दडपण्याचे कारस्थान सरकार करीत आहे. पुढील तीन दिवसांत किसान सभा महाराष्ट्रात तीव्र आंदोलन करेल. प्रसंगी दिल्लीत धडक देईल, असा इशारा डॉ. अजित नवले यांनी दिला.

टीम अॅग्रोवन

पुणे  : शेतकऱ्यांच्या दिल्लीतील आंदोलनाची केंद्र सरकार उपेक्षा करीत आहे. या आंदोलनात फूट पाडून आंदोलन दडपण्याचे कारस्थान सरकार करीत आहे. शेतकरी आंदोलनाची उपेक्षा थांबवून केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात. अन्यथा पुढील तीन दिवसांत किसान सभा महाराष्ट्रात तीव्र आंदोलन करेल. प्रसंगी दिल्लीत धडक देईल, असा इशारा अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी मंगळवारी (ता. १५) पत्रकार परिषदेत दिला.

या वेळी अजित अभ्यंकर, किसान सभेचे पुणे जिल्हाध्यक्ष नाथा शिंगाडे उपस्थित होते. केंद्र सरकारने लोकशाही विरोधी पद्धतीने मंजूर करवून घेतलेले तीन शेतकरी विरोधी कायदे मागे घ्यावेत; शेतकऱ्यांना हमीभावाचे कायदेशीर संरक्षण मिळावे, यासाठी केंद्रीय स्तरावर कायदा करावा. शेतकरी विरोधी प्रस्तावित वीज विधेयक मागे घ्यावे, या प्रमुख मागण्यांसाठी दिल्ली येथे २६ नोव्हेंबरपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत असून, आठ डिसेंबरला भारत बंद करून विविध संस्था संघटनांनी आंदोलनात उडी घेतली आहे.  आंदोलन बदनाम करण्याचे कारस्थान  केंद्राने केलेले कायदे शेतकऱ्यांना कायद्याच्या जोखडातून मुक्त करणारे असल्याचे सरकार सांगत आहे. या कायद्यांमुळे शेतकरी नव्हे, भांडवलदार कायद्याच्या जोखडातून मुक्त होणार आहेत. यामुळे शेतकरी अडचणीत येणार असून, केंद्र सरकारने तातडीने हे कायदे मागे घ्यावेत. शेतकऱ्यांच्या दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी किसान सभेची बैठक नुकतीच झाली. तीन दिवसांत हे कायदे मागे न घेतल्यास किसान मोर्चा राज्यात तीव्र आंदोलन करेल, प्रसंगी दिल्लीत धडक देऊ, असेही नवले यांनी सांगितले.  दिल्लीतील आंदोलन कमजोर करण्यासाठी डावपेच आखले जात आहेत. शेतकऱ्यांना खलिस्तानवादी म्हणत आंदोलनाचा मनोभंग करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आंदोलनाला पाकिस्तानची फूस आहे, अशा प्रकारचे संतापजनक आरोप करून शेतकरी आंदोलन बदनाम करण्याचे कारस्थान आखण्यात आले आहे. केंद्र सरकार व भाजपच्या या निंदनीय कृत्यांचा किसान सभा निषेध करीत आहे, असेही नवले म्हणाले.   

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Maharashtra 2026 : दुष्काळाच्या स्थितीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Maharashtra Cabinet Decisions: साखर कारखाने, ऊस शेतकऱ्यांना दिलासा; ७५० कोटींच्या सॉफ्ट लोन धोरणाला मंजुरी, मुख्यमंत्र्यांची माहिती

Dam Water Storage Update: यावल, रावेरातील प्रमुख सिंचन प्रकल्प भरले

Maharashtra Rain Update: विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप कायम

Rainfall Deficit: पावसाअभावी राज्यात चिंताजनक स्थिती; शेतकरी- शेतमजुरांच्या हिताचा सरकार विचार करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

SCROLL FOR NEXT