बोंडअळी नियंत्रणाबाबत मार्गदर्शन
बोंडअळी नियंत्रणाबाबत मार्गदर्शन 
मुख्य बातम्या

बोंड अळी नियंत्रणासाठी फेरोमोन ट्रॅप लावावेत ः जिल्हाधिकारी पाण्डेय

टीम अॅग्रोवन

अकोला  : गत हंगामात बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. बोंड अळी नियंत्रणासाठी कपाशीच्या शेतात फेरोमोन ट्रॅप लावल्यास मोठा फायदा होतो. बोंड अळीच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी शेतात तातडीने फेरोमोन ट्रॅप लावावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी केले.

महसूल प्रशासनातर्फे एक अाॅगस्ट हा फेरोमोन डे साजरा करण्यात अाला. या वेळी श्री. पांडेय यांनी तालुक्यातील कापशी येथे विष्णू वडतकर यांच्या कपाशीच्या शेतात जात शेतकऱ्यांशी संवाद साधला. या वेळी उपविभागीय अधिकारी संजय खडसे, तहसीलदार विजय लोखंडे, तालुका कृषी अधिकारी नरेंद्र शास्त्री, सरपंच अंबादास उमाळे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

या वेळी जिल्हाधिकारी पाण्डेय म्हणाले, की बोंड अळीचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी उपाययोजना म्हणून फेरोमोन ट्रॅपचा वापर करावा. बोंड अळीचा प्रादुर्भाव शेतात दिसून आल्यास कृषी विभाग, तसेच कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार कीडनाशकाची फवारणी करावी. कृषी सहायकांनी शेतात जाऊन फेरोमोन ट्रॅप बसविण्याची कार्यवाही येत्या दोन-तीन दिवसांत पूर्ण करावी.

या वेळी अधिकारी कपाशीच्या शेतालगत सोयाबीन पिकाची पाहणी करण्यासाठी गेले. या ठिकाणी सोयाबीनवर चक्रीभुंगा तसेच स्पोडोप्टेरा अळीचा प्रादुर्भाव दिसून अाला. या ठिकाणी तालुका कृषी अधिकारी नरेंद्र शास्त्री यांनी शेतकऱ्यांना कीड निर्मूलनाबाबत उपाययोजनेविषयी मार्गदर्शन केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

World Veterinary Day : मानवी आरोग्यातही पशुवैद्यकाचे बहुमूल्य योगदान

Agricultural Exports : खेळखंडोबा शेतीमाल निर्यातीचा!

Lok Sabha Election 2024 : टपाली मतदानास १,६६२ मतदारांची पसंती

Lok Sabha Election 2024 : सात हजार कर्मचाऱ्यांना नोटीस पाठविण्यास सुरुवात

Banana Orchard Damage : सारी केळी भुईसपाट

SCROLL FOR NEXT